Download App

महाराष्ट्राच्या राजकारणात नवी आघाडी ?, संभाजीराजेंनी घेतील जरांगे पाटलांची भेट, ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

समाजात वेगळा मेसेज जाऊ नये म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे. 29 ऑक्टोबरच्या अगोदर हे फॉर्म द्यावे लागतात. त्यापूर्वी आपल्याला एकसंघ

  • Written By: Last Updated:

Sambhaji Raje and Manoj Jarang Meet : माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे पाटील यांची आज भेट घेतली. आपलं ध्येय एक आहे, वेगवेगळं लढू नये, अपक्ष आमदार सोयीचे राजकारण करतात, ते उभे केल्यास काय धोका आहे हे आपण मनोज जरांगे पाटील यांच्या लक्षात आणूण दिल्याचं (Manoj Jarang) संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. ते जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलत होते. संभाजीराजे अन् जरांगे पाटील भेट, या विषयावर झाली चर्चा

समाजात वेगळा मेसेज जाऊ नये म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे. 29 ऑक्टोबरच्या अगोदर हे फॉर्म द्यावे लागतात. त्यापूर्वी आपल्याला एकसंघ रहावं लागेल असं असं आपण मनोज जरांगे पाटील यांना म्हटल असल्याचंही संभाजीराजे यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, उदय सामंत यांनी जरांगे यांची भेट घेतली. मी माझ्या काही सहकाऱ्यांचे एबी फॉर्म घेऊन आलो होतो. मनोज जरांगे दिवसभर कामात व्यस्त असतात. त्यामुळे मी त्यांना फोन करून वेळ आहे का? अशी विचारणा केली. काल मला समजलं आज ते कामातून थोडे मोकळे झालेत. त्यामुळे एक मित्र म्हणून त्यांची भेट घ्यावी असं सामंत म्हणाले.

मोठी बातमी! संभाजी ब्रिगेड अन् ठाकरे गटाची युती तुटली, ब्रिगेड जरांगेंना साथ देणार?

आता मी मनोज जरांगे यांची रात्री भेट घेतली असती तर बातमी झाली असती. उन्हात भेटलो असतो तर ब्रेकिंग झाली असती. त्यामुळे कसे भेटायचे हा प्रश्नही माझ्यापुढे होता. पण आमची ही भेट राजकीय नव्हती. त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मी आलो, त्यांना भेटलो, चर्चा झाली, चहा घेतला व निघालो.

फडणवीसांनी आरक्षण दिले नाही

मनोज जरांगे पाटील यांनीही यावेळी उदय सामंत यांच्याशी राजकीय व सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याचं सांगितले. उदय सामंत यांच्याशी सामाजिक व राजकीय विषयांवर चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले नाही. त्यामुळे त्याच्यावर 30 तारखेला निर्णय येईल. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. आम्ही जे स्वप्न पाहिले ते पूर्ण झाले नाही. आम्हाला आरक्षणाची आस लागली होती. ती फडणवीस यांनी पूर्ण होऊ दिली नाही. आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, पण फडणवीसांनी आरक्षण मिळू दिले नाही, असे ते म्हणाले आहेत.

follow us