Download App

Sharad Pawar : शरद पवारांनी रायगडमध्ये टाकला डाव; अदिती तटकरेंविरुद्ध उमेदवार सापडला?

माणगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद होतं. मात्र, हे पद आणि पक्षही त्यांनी सोडला आहे. ते आता तुतारी हाती घेत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार

  • Written By: Last Updated:

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्याप्रमाणात पक्षांतर सुरु झालं आहे. (Sharad Pawar) शरद पवारांच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरु असतानाच दुसरीकडे भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला गळती लागल्याचं चित्र दिसत आहे. अशातच आता रायगड जिल्ह्यामध्येही मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. येथील एका बड्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून आता थेट शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याचं समजतय.

तटकरेंना देणार आव्हान

मुख्यमंत्री शिंदेंच्या पक्षातून ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणाऱ्या ज्ञानदेव पवार यांच्याकडे माणगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद होतं. मात्र, हे पद आणि पक्षही त्यांनी सोडला आहे. ते आता तुतारी हाती घेत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. आता शरद पवारांच्या पक्षाला रायगडमध्ये अदिती तटकरेंविरुद्ध लढण्यासाठी दमदार संधी मिळाल्याचं मानलं जातंय त्याचं नाव आहे.

कोकणात भाजपला धक्का! माजी आमदार हाती बांधणार शिवबंधन; नारायण राणेंवर गंभीर आरोप

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ज्ञानदेव पवार यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने रायगडच्या स्थानिक राजकारणात भूकंप झाला होता. ज्ञानदेव पवार यांनी कोणतीही पूर्व कल्पना न देता नगराध्यक्षपदाचा राजीनामा रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला होता. नगराध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर ज्ञानदेव पवार लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील दोन आठवड्यांहून अधिक काळापासून होती. अखेर यावर आता शिक्कामोर्बत झालं आहे.

 पवार यांनी उपोषण केलं

ज्ञानदेव पवार हे शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष होते आणि ते स्थानिकांमध्येही प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यामुळे ज्ञानेश्वर पवारांनंतर नगराध्यक्ष कोण हा प्रश्न एकनाथ शिंदेंच्या पक्षासमोर असतानाच आता ज्ञानेश्वर पवारांनी थेट शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत शिंदेंबरोबरच अजित पवारांसमोरही मोठी अडचण निर्माण केली आहे. मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर व्हावा यासाठी ज्ञानदेव पवार यांनी उपोषण केलं होतं. त्यामुळे ते माणगावमध्ये प्रचंड चर्चेत आलेले.

follow us