Download App

पवारांनी ऐनवेळी मोहोळचा उमेदवार बदलला; सिद्धी कदमांचा पत्ता कट, दुसरा कोण दिला उमेदवार?

शरद पवार आणि मोहोळ विधानसभेतील शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सिद्धी रमेश कदम यांचा नावं देण्यात

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar NCP Candidate List : मोहोळ मतदारसंघातून सिद्धी रमेश कदम यांना देण्यात आलेली उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. सिद्धी या मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या आहेत. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले होते. सोमवारी सकाळी मोहोळ विधानसभेतील नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने शरद पवारांची भेट घेऊन सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली होती. शरद पवार यांनी या सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सिद्धी कदम यांची उमदेवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला.

शरद पवार आणि मोहोळ विधानसभेतील शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सिद्धी रमेश कदम यांचा नावं देण्यात आलेला एबी फॉर्म रद्द समजण्यात यावा, असे पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठवलं. आता सिद्धी कदम यांच्याऐवजी शरद पवार गटाकडून मोहोळमधून राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तत्पूर्वी सिद्धी कदम यांनी उमेदवारी जाहीर झाल्यामुळे सोमवारी आपला उमेदवार अर्ज भरला. मात्र, आता शरद पवार गटाच्या भूमिकेमुळे रमेश कदम आणि सिद्धी कदम काय भूमिका घेणार, हे पाहावं लागेल.
प्रचाराची सूत्रं सांभाळणारी लेक

सिद्धी कदम या वयाने लहान असल्या तरी त्यांना निवडणुकीची प्रचार मोहीम हाताळण्याचा अनुभव होता. सिद्धी कदम हिने गत 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्धच प्रचार यंत्रणा राबवून तगडी फाईट दिली होती. विद्यमान आमदार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार यशवंत माने यांनाच वडिलांसाठी टक्कर दिली होती. कारण, 2019 साली सिद्धीचे वडील रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ गैरव्यवहार प्रकारणात अटकेत होते, तेव्हा विधानसभा निवडणुकांची धुरा सिद्धीनेच सांभाळली. त्यावेळी अपक्ष असलेल्या रमेश कदम यांना 23 हजारांहून अधिक मतं मिळाली होती, त्यामध्येही सिद्धीच्या उत्तम नियोजनाचा व सोशल बॉण्डिंगचा मोठा वाटा राहिला आहे.

संपत्ती अवघी 1 लाख

मोहोळ विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाने यंदाच्या निवडणुकीत सर्वात तरुण उमेदवाराला संधी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम या अवघ्या 26 वर्षीय तरुणीला शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी सिद्धी कदम यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी सिद्धी यांनी शपथपत्रात स्वतःविषयी संपूर्ण माहिती नमूद केली. त्यांचे शिक्षण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मधून मास्टर ऑफ आर्ट्स इन वुमन स्टडीज संस्थेतून झाले आहे.

follow us

संबंधित बातम्या