Razakars kill Kharges family : हैदराबाद संस्थानातील रझाकार मिलिशियांचा उल्लेख करून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील निवडणूक प्रचार सभांमध्ये (Kharges ) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लक्ष्य केलं. आदित्यनाथ यांनी म्हटलं की, खरगे यांच्या आईचा आणि बहिणीचा मृत्यू रझाकारांच्या हल्ल्यात झाला. परंतु, ते त्या गोष्टीवर मुद्दाम गप्प आहेत कारण त्यांना मुस्लीम मतदार गमावण्याची भीती वाटते.
रझाकार कोण होते?
रझाकार या शब्दाचा अर्थ फारसी आणि उर्दू भाषेत ‘स्वयंसेवक’ किंवा ‘सहाय्यक’ असा होतो. १९७१ च्या बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धात या शब्दाचा वापर पाकिस्तानी सैन्याला सहकार्य करणाऱ्यांसाठी करण्यात आला. निजामांचं हैदराबाद हे भारतातील ५०० संस्थानांपैकी एक होते. हैदराबादमधील हिंदूबहुल लोकसंख्या भारतात विलीन होण्यास इच्छुक होती. परंतु, निजामाने त्यास नकार दिला. निजामची सशस्त्र सेना रझाकार ही मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे सशस्त्र अंग होती. असंही ते म्हणाले.
योगी आदित्यनाथांच्या गोरखपूरमध्ये घमासान!;इस बार मामला फिल्मी है
सुरुवातीला, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील भारतीय सरकारने हैदराबादच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, १७ सप्टेंबर १९४८ रोजी सुरु झालेल्या ‘ऑपरेशन पोलो’ नावाच्या भारतीय लष्कराच्या तीन दिवसांच्या मोहिमेनंतर हैदराबाद भारतात विलीन झाले. निजामाकडून झालेल्या पोलीस अत्याचारांच्या अहवालांच्या पार्श्वभूमीवर, पंडित नेहरूंनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. परंतु, या चौकशीचा अहवाल कधीही सार्वजनिक करण्यात आला नाही.
आदित्यनाथ काय म्हणाले?
मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या विधानावर प्रत्युत्तर देताना योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘भगवी वस्त्रे घालणाऱ्यांनी आणि डोकं मुंडण करणाऱ्यांनी राजकारण सोडावे असा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी दिला होता. काँग्रेस अध्यक्ष माझ्यावर विनाकारण राग काढत आहेत. माझ्यावर राग काढू नका. त्या हैदराबादच्या निजामांवर किंवा त्या निजामांच्या रझाकारांवर राग काढा, ज्यांनी तुमचे गाव जाळले आणि तुमच्या सन्माननीय आई, बहीण, आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा जीव घेतला असंही योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.