मुंबई : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकांचा (Maharashtra Assembly Election) धुराळा उडणार असून, त्याआधी राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. या सर्व तापलेल्या वातावरणातच भाजपचा विधानसभेसाठीचा भेदक अन् आक्रमक जाहीरनामा समोर आला आहे. तर, दुसरीकडे जिंकण्यासाठी जन्म आपुला असा नारा देत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंनी (Amit Shah) सर्वांना कामला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबत एबीपी माझानं वृत्त दिले आहे. (BJP Manifesto For Maharashtra Assembly Election)
सलमानसोबत लग्न करायचंय…; फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटली
भाजपच्या जाहीर नाम्यात नेमकं काय?
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपच्या विधानसभेच्या जाहीरनामा हा यापूर्वीच्या जाहीरनाम्यापेक्षा भेदक आणि आक्रमक स्वरूपाचा बनवण्यात आला आहे. यात काँग्रेसकडे 50 वर्षांचा हिशेब मागण्यात आला आहे. तसेच जनेतेसाठी काय करणार हे सांगण्याबरोबर काँग्रेसने काय केलं नाही हेदेखील जाहीरनाम्यात मांडण्यात आले आहे.
पक्षनिष्ठेचं फळ! राजन पाटलांवर राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी
जाहीरनाम्यात भाजप काय करणार? याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय काँग्रेसने 50 वर्ष सत्ता उपभोगूनही काय केले नाही याचा पर्दाफाश या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे.. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यातील काँग्रेसने घोषणा करूनही रखडलेल्या जिल्ह्यातील पाच प्रकल्पांची माहिती मागवण्यात आली असून, ही माहिती जमा करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांची फौज कामाल लावण्यात आली आहे.
एखाद्याने हल्ला केल्यावर टाळ्या वाजवत बसणार का?, बदलापूर एन्काउंटरवर फडणवीसांचं रोखठोक मत
याशिवाय छोट्या जातींच्या प्रलंबित मागण्यांनाही भाजपच्या जाहीरनाम्यात स्थान देण्याबरोबरच आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, महिला बचतगट, कोतवाल, तलाठी, ग्रामसेवक अशा घटकांनाही विशेष स्थान देण्यात आले आहे. एकूणच भाजपच्या प्रकाशित होणाऱ्या या जाहीरनाम्यात काँग्रेसची रेघ कशी छोटी आहे आणि घोषणा कशा मोठ्या आहेत हेच दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत असल्याचे समोर येत आहे.