Maharashtra Assembly Election : राहुरीत राडा, गोळीबारात दोन कार्यकर्ते जखमी

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election) या संपल्या असून निकाल देखील घोषित झाला मात्र आता त्यानंतर

Maharashtra Election

Maharashtra Election

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election) या संपल्या असून निकाल देखील घोषित झाला मात्र आता त्यानंतर राजकीय खटके उडू लागले आहे. निकालाच्या अवघ्या दुसऱ्याच दिवशी राहुरीमधून (Rahuri) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निकालानंतर राहुरी तालुक्यातील पांढरी पुल येथील एका गावात गोळीबाराची घटना घडली असून यात दोन जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

माजी मंत्री आणि पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांच्या कार्यकर्त्यांकडून गोळीबार झाल्याची चर्चा होत आहे. तसेच निवडणुकीच्या कारणावरून हा प्रकार झाल्याचे समजते आहे. यामुळे नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, निवडणुकीच्या वादातून राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत.

दरम्यान सदरची घटना रविवार दि. 24 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचे समजते आहे. भाऊसाहेब शिवाजी नवले व संजय शिवाजी नवले हे दोघे या गोळीबारात जखमी झाले आहे. संजय नवले यांच्या डोक्याला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत तर भाऊसाहेब नवले यांना गोळी लागली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान नवले हे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे समर्थक असल्याचे कळते आहे. जखमी नगरमधील सुरभी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. या घटनेची माहिती मिळताच राहुरीचे पो.नि. संजय ठेंगे यांनी आपल्या सहकार्यांना घेऊन घटनास्थळी भेट देऊन आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल असे सांगीतले आहे.

पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, झिम्बाब्वेने 80 धावांनी सामना जिंकला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 236 जागा जिकंले आहे तर महाविकास आघाडीला फक्त 49 जागांवर विजय मिळाला आहे आणि 3 जागांवर इतरांना विजय मिळाला आहे. नगर जिल्ह्यात 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून महाविकास आघाडीचे उमेदवार 2 जागांवर विजयी झाले आहे.

Exit mobile version