Rahuri Assembly Constituency : जुन्या गुन्ह्यांवरून प्राजक्त तनपुरे यांची शिवाजीराव कर्डिलेंवर टीका
Prajakt Tanpure News : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरु असतानाच उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. अशातच राहुरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमदेवार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्यावर प्राजक्त तनपुरे यांनी टीका केली.
निलंगा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जात नाही; जनताचं सर्वांना उत्तर देईन, निलंगेकरांचा प्रचार जोरात
पुढे बोलताना तनपुरे म्हणाले, निवडणूक आयोगाकडून उमेदवारांवर असलेल्या गुन्ह्यांची माहिती देणे बंधनकारक करण्यात आलंय. त्यानुसार विरोधक उमेदवाराने एका इंग्रजी वृत्तपत्रात दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती दिलीयं. माझ्यावर तर एकच गुन्हा दाखल आहे, तोही ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आलायं. मात्र, शिवाजीराव कर्डिलेंबाबतच्या गुन्ह्यांच्या माहितीसाठी अर्ध पान लागलंय, अशी टीका तनपुरे यांनी केलीय.
झारखंडच्या ‘या’ ३२ मतदारसंघांत महिलाच किंगमेकर; भाजपसाठी वाटचाल आव्हानात्मक
दरम्यान, निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीत इनकमिंग सुरु असल्याचं दिसून येत आहे. राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात तरुणांचा वाढता ओघ आमदार प्राजक्त तनपुरे यांना पाठींबा देत असल्याचे चित्र आहे. गुहा आणि कानडगावमध्ये अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. हा भाजपाला धक्का मानला जात आहे. गुहा येथील सोसायटीचे माजी चेअरमन शरद गोरक्षनाथ कोळसे यांनी भाजपाला रामराम करत तुतारी हाती घेतली आहे.
राहुरी मतदारसंघात प्राजक्त तनपुरे यांचा जोरदार प्रचार सुरु असून तनपुरेंकडून मतदारसंघातील गावात पोहोचून नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. काल तनपुरे यांचा बुऱ्हानगर, नागरदेवळे कापूरवाडी, वडारवाडी, दरेवाडी भागात प्रचार रॅली काढण्यात आली होती. यावेळी नागरिकांनी फटाके वाजवत तनपुरेंचं स्वागत करत विजयाचा विश्वास व्यक्त केलायं.