निलंगा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जात नाही; जनताचं सर्वांना उत्तर देईन, निलंगेकरांचा प्रचार जोरात
Nilanga Assembly Election 2024 : निलंग्याचे भाजप उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांचा सध्या आशीर्वाद यात्रेअंतर्गत जोरदार प्रचार सुरू आहे. आज सावरी येथे जाहीर सभा पार पडली. (Nilanga Assembly ) सावरीकरांच्या उदंड प्रतिसादात पार पडलेल्या या सभेत मतदारसंघाच्या विकासाचा आलेख मांडत असताना मतदारसंघाच्या स्वाभिमानावर घाला घालणाऱ्या सर्वांचा निलंगेकर यांनी चांगलाच समाचार घेतला.
माझा निलंगा मतदारसंघ हा कधीही कोणाच्या वाट्याला जात नाही. तो फक्त प्रेम, विश्वास आणि विकास या तीन गोष्टी घेऊन पुढे जातो आणि इतरांच्या मदतीला कायम धावतो. पण काही लोक आमच्या स्वाभिमानाला खेटायला मुद्दामहून येत आहेत. निलंगा मतदारसंघाच्या स्वाभिमानावर उठलेल्या प्रत्येकाला उत्तर देण्यासाठी माझी माय-बाप जनता समर्थ आहे. पण त्यांचा हा पठ्या देखील तितकाच समर्थ आहे असा थेट इशाराच निलंगेकर यांनी दिला आहे.
संभाजी पाटील निलंगेकरांच्या प्रचारात प्रचंड गर्दी; आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून डोर टू डोर संवाद
समोरच्याने भलेही क्रिकेटची टीम उभी केली असली तरी मी मात्र त्यांच्याशी कुस्तीच खेळणार, अशा शब्दात निलंग्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना इशारा आहे. तसंच, येत्या २० तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून महायुतीला प्रचंड मताधिक्याने विजयी करून विरोधकांना सडेतोड उत्तर द्या, अशी आवाहनही निलंगेकर यांनी मतदारांना केलं आहे. तसंच, आपल्या काळात मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे हे सर्वांना दिसत आहे असंही ते यावेळी म्हणाले.
यावेळी विधानसभा निरिक्षक दगडूजी सोळुंके, माजी जि.प. सभापती संजयजी दोरवे, डॉ. ज्ञानेश्वरजी कदम, पप्पुजी पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीरजी पाटील, रिपाई आठवले गटाचे अंकुशजी ढेरे, तालुकाध्यक्ष संदीपजी कांबळे, निलंगा शहराध्यक्ष विनोदजी सुरवसे, सरपंच संजयजी सुर्यवंशी, वाघजी पाटील, मुरलीधरजी अचुले, बालाजी सगरे जी, बबनजी पाटील, रामजी पाटील, कडाजीरावजी सगरे, गोविंदरावजी पाटील, व्यंकटजी सगरे, नागनाथजी स्वामी, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.