Maharashtra Assembly Session : राज्यातील ऑटोरिक्षा चालक आणि टॅक्सीचालकांना द्यावे लागणारे 50 रुपये विलंब शुल्क आजपासूनच रद्द करण्यात येईल अशी मोठी घोषणा मंत्री दादा भुसे यांनी आज विधिमंडळात केली. राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा आज अकरावा दिवस आहे. राज्यातील ऑटोरिक्षा चालकांकडून हे विलंब शुल्क रद्द करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. यासाठी अनेक वेळा आंदोलनेही झाली होती. अखेर सरकारने या मागणीची दखल घेतली असून विलंब शुल्क आजपासूनच रद्द करण्यात येईल अशी घोषणा मंत्री भुसे यांन केली.
केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार आणि परिवहन आयुक्तांच्या पत्रानुसार रिक्षाचालकांना वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण विलंब शुल्क प्रतिदिन 50 रुपये या प्रमाणे आकारणी केले जात होते. विलंब शुल्क डिसेंबर 2016 पासून लागू करण्यात आले होते. रिक्षाचालकांना काही अडचणींमुळे वेळेत योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करता आले नाही अशा रिक्षाचालकांना सत्तर ते ऐंशी हजार रुपये विलंब शुल्क भरावे लागणार होते.
इतकी मोठी रक्कम भरणे अनेक रिक्षाचालक आणि टॅक्सीचालकांना शक्य नव्हते. त्यामुळ विलंब शुल्क रद्द करण्याची मागणी या चालकांकडून सातत्याने केली जात होती. यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनांनी अनेक वेळा आरटीओ कार्यालयासमोर आंदोलने केली होती. आरटीओ अधिकाऱ्यांना निवेदनेही दिली होती. मात्र तोडगा निघत नव्हता.
बातमी अपडेट होत आहे..