‘महाराष्ट्र भूषण’चा वाद चिघळला! फडणवीसांना घेरत जयंत पाटलांनी केली ‘ही’ मागणी

Jayant Patil : एप्रिल महिन्यात मुंबईतील खारघर येथे राज्य शासनाच्यावतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भर उन्हात हा कार्यक्रम घेतल्याने अनेकांना उष्माघाताचा त्रास होऊन काही जणांचा मृत्यू झाला. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली मात्र, पुढे काहीच झाले नाही.  विरोधकांनी सरकारच्या या कारभारावर टीका केली. समितीला पुन्हा मुदतवाढ न देता पंधरा […]

Jayant Patil

Jayant Patil

Jayant Patil : एप्रिल महिन्यात मुंबईतील खारघर येथे राज्य शासनाच्यावतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भर उन्हात हा कार्यक्रम घेतल्याने अनेकांना उष्माघाताचा त्रास होऊन काही जणांचा मृत्यू झाला. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली मात्र, पुढे काहीच झाले नाही.  विरोधकांनी सरकारच्या या कारभारावर टीका केली. समितीला पुन्हा मुदतवाढ न देता पंधरा दिवसांच्या आत समितीचा अहवाल सभागृहापुढे आणावा. तसेच ज्या कोणी शहाण्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले त्याला कारणीभूत ठरवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेची थरारक कहाणी अजित पवारांनी सभागृहात सांगितली

विधीमंडळाच्या प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान बोलताना पाटील म्हणाले, ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं. त्याच मंत्र्यांना या प्रश्नाचे उत्तर द्यायला सांगणे आणि त्यांनी त्याचे अप्रत्यक्षपणे समर्थन करणे असा हा प्रकार आज सभागृहात दिसत आहे. खरं तर या प्रश्नाचे उत्तर गृह खात्याने देणे अपेक्षित आहे. हा विषय गृहखात्याकडे द्यायला पाहिजे होता. त्यामुळे आमची मागणी आहे की गृहमंत्र्यांनीच या प्रश्नाचे उत्तर द्यायला पाहिजे.

फडणवीसांनीच उत्तर दिले पाहिजे

समिती स्थापन करून तीन महिने झाले आता परत या समितीला जुलै महिन्यात मुदतवाढ दिली आहे. असा कसा हा गहन प्रश्न आहे. मृत्यू झालेला आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याबद्दल आदर आहे. त्यांच्याबद्दल कुणाचीही तक्रार नाही. पण भर उन्हात साडेसहाशे एकर परिसरात वीस लाख लोकांना बोलावणे. त्यांची सोय न करता त्यांना मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागणे असा कोण शहाणा आहे ज्याने या कार्यक्रमाचं आयोजन केलं याची चौकशी झाली पाहिजे. ज्याने हा कार्यक्रम घेतला त्याला कारणीभूत ठरवले गेले पाहिजे.

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेची थरारक कहाणी अजित पवारांनी सभागृहात सांगितली

चौकशी समितीला कोणतीही मुदतवाढ न देता 15 दिवसात समितीचा अहवाल समोर आणा. समितीने काढलेले निष्कर्ष सभागृहासमोर ठेवले गेले पाहिजेत ही आमची मागणी आहे, असे पाटील म्हणाले.

Exit mobile version