Vijay Wadettiwar : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बनावट (Eknath Shinde) सही आणि शिक्के असलेली काही निवेदने समोर आली आहेत. या प्रकाराने खळबळ उडाली असून राजकारणातही तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्य सरकारनेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कुणालाही पाठिशी घालणार नाही. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विधानसभेत दिली.
या प्रकारावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही खोचक टोलेबाजी केली. राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात अशा घटना होतात हे गंभीरच आहे. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. याआधीही महाराष्ट्रानं पाहिलं आहे की मुख्यमंत्री कार्यालयात तोतया ओएसडी सहा महिने होता. अगदी बिनधास्तपणे त्याचा सगळीकडे वावर होता कामही चाललं होतं. नेमकं काय चाललंय राज्यात हे कळत नाही. इतकेच नाही तर त्या तोतयाने आठ अधिकाऱ्यांच्या बदल्या सुद्धा केल्या होत्या. सरकारी कामांत तो हस्तक्षेप करत होता. स्वतः फाइल घेऊन तो मुख्यमंत्र्यांकडे जायचा आणि सही घेऊन यायचा.
एकनाथ शिंदे ‘सूरत’ला गेले माहिती नव्हतं, एक फोन आला अन्.. श्रीकांत शिंदेंना नेमकं कळालं तरी कधी?
तो खरा आहे की खोटा विशेष कार्यकारी अधिकारी आहे हे सुद्धा मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हतं. आता असं करा मुख्यमंत्री डुप्लीकेट आणा उपमुख्यमंत्री डुप्लीकेट आणा, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वडेट्टीवारांना चांगलंच सुनावलं
अजितदादा म्हणाले, मी असं म्हणणार नाही की विरोधी पक्षनेते पण डुप्लिकेट आणा. माझं तसं म्हणण्याचं काही कारणही नाही. पण असं नाही. आपण विरोधी पक्षनेते आहात. मीही त्या पदावर काम केलं आहे. ही बाब गंभीरच आहे. या प्रकाराची राज्य सरकारने ताबडतोब दखल घेतली. त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याची सखोल चौकशी करून यामागचा मास्टरमाइंड कोण आहे. त्याने असं का केलं हे सगळं बाहेर येईल. त्यानंतर आम्ही सगळी माहिती सरकारला देऊ. या प्रकरणात कुणालाच पाठिशी घालण्याचा सरकारचा विचार नाही.
Ajit Pawar : ‘दोघंही चांगलं बोलत अन् हसत होते, घडलेली घटना अतिशय.. अजितदादांची पहिली प्रतिक्रिया