Download App

उद्धव ठाकरेंची कोंडी करणारं हेच ते पत्र ! ठाकरेंनीच सांगितलं होतं तसं, मग आता..

Barsu Refiney News : राजापूर येथील रिफायनरीच्या (Barsu Refinery) सर्वेक्षणावरून आज सकाळपासूनच जोरदार वाद सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या सर्वेक्षणाला विरोध केला आहे. प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला असून 25 महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे वाद आणखी पेटला आहे.

सत्ताधारी आणि विरोधकांतही जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)मुख्यमंत्री असतानाचे एक पत्र समोर आले आहे. हे पत्र ठाकरे यांनी केंद्र सरकारला पाठवले होते. आता तेथील आमदार रिफायनरी झाली पाहिजे असे म्हणतात तर खासदार विनायक राऊत म्हणतात वेळ पडली तर उद्धव ठाकरे तेथे येतील असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

किसान सभेचे पुन्हा राज्यव्यापी आंदोलन, महसूल मंत्र्यांच्या कार्यालयावर धडकणार लाल वादळ

विशेष म्हणजे, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनीच बारसू येथील जागा सुचविली होती. त्यांनी रिफायनरीच्या समर्थनार्थ मोदींना पत्र पाठवले होते. 12 जानेवारी 2022 रोजी हे पत्र पाठवण्यात आलं होतं. त्यावेळी राज्य सरकारने बारसू येथे 13 हजार एकर जमीन प्रकल्पासाठी देण्याची तयारी दाखविली होती. तसेच येथील बहुतांश जागा ओसाड असल्याने पुनर्वसनाचा प्रश्न फारसा येणार नाही, असेही या पत्रात म्हटले होते.

Letter 2

या पत्रानंतरच केंद्राने रिफायनरी सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. हे पत्र समोर आल्याने आता ठाकरे गटाचीही कोंडी झाली आहे. सत्ताधारी गटातील नेते या पत्रावरून ठाकरे गटावर टीका करू लागले आहेत. आता या प्रकरणी उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत. ते काय बोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रसार माध्यमांना हटवलं नाही

पोलिसांकडून मीडिया प्रतिनिधींना हटवलं जात आहे, अशी तक्रार केली गेली आहे. त्यावर बोलताना उदय सामंत म्हणाले की, अशी कोणतीही घटना घडली नाही. मी स्वतः तिथली परिस्थिती पाहतो आहे, फक्त काही लोक आंदोलक महिलांना उलटसुलट प्रश्न विचारत आहेत. त्यांमुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून त्यांना रोखण्यात आलं आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

‘या’ मान्यवरांना मिळाला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, पाहा क्षणचित्रे

बारसू रिफायनरी हा क्रांतिकारी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील एक ते डिड लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे आंदोलकांची समजूत काढली जाईल. काही लोकांना असं वाटत होत की तिथे मोठे आंदोलन होईल, पण तसं झालं नाही. त्यामुळे लोक जालियनवाला बाग होईल. अशी टीका करत आहेत. असं त्यांनी संजय राऊत यांना उत्तर दिलं.

Tags

follow us