‘2024 नंतर तुमच्यावर चारचौघात भाषण करण्याची वेळ येईल’; बावनकुळेंचा ठाकरेंवर पलटवार

Chandrashekhar Bawankule replies Uddhav Thackeray : ठाण्यात काल शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून हिंदी भाषकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. 2024 ची आपली संधी हुकली तर हा देश नालायकांच्य आणि हुकुमशहांच्या हातात जाईल अशी घणाघाती टीका ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेचा समाचार […]

Chandrashekha Bawankule

Chandrashekha Bawankule

Chandrashekhar Bawankule replies Uddhav Thackeray : ठाण्यात काल शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून हिंदी भाषकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. 2024 ची आपली संधी हुकली तर हा देश नालायकांच्य आणि हुकुमशहांच्या हातात जाईल अशी घणाघाती टीका ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेचा समाचार घेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.

बावनकुळे यांनी एक ट्विट केलं आहे. ‘बऱ्याच दिवसांनंतर उबाठाचे नेते उद्धव ठाकरे काल घराबाहेर पडले आणि मजल दरमजल करत त्यांनी ठाणे गाठले. कधी नव्हे ते त्यांना उत्तर भारतीय मतदारांची आठवण झाली. आणि पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर टीका केली. देशासाठी मोदीजी काय करतात याचे प्रमाणपत्र उद्धव ठाकरेंनी देण्याची गरज नाही. मोदीजींमुळे देशाची मान उंचावली आहे. पण, उद्धवजी तुमच्या हिंदुत्वविरोधी भूमिकेमुळे प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिकांची मान शरमेने झुकली आहे. मोदीजींना हुकूमशाह म्हणणारे तुम्ही सोनिया गांधींपुढे मात्र लोटांगण घालत आहात.’

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी हे फक्त तुमच्या भाषणात आहे प्रत्यक्ष कृतीत मात्र आदित्य ठाकरेंना मंत्री करताना तुम्हाला सच्चा शिवसैनिक दिसला नाही. त्या प्रामाणिक शिवसैनिकाला दूर ठेवले म्हणूनच कधीकाळी हजारोंच्या उपस्थितीत सभा घेणाऱ्या उद्धव ठाकरेंना नाट्यगृहात एकपात्री प्रयोग करावा लागला. तुमचे असेच नाट्य सुरू राहिले तर 2024 नंतर तुमच्यावर चारचौघात भाषण करण्याची वेळ येईल’, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले ?

तुम्ही म्हणता मी काँग्रेसबरोबर गेलो होतो. होय, मी काँग्रेसबरोबर गेलो होतो पण, खुलेआम गेलो होतो. मी तुमच्यासारखं अर्ध्या रात्री लपून-छपून बैठका नव्हत्या घेतल्या. पण मी भाजपला एक प्रश्न विचारतो की आम्हाला काँग्रेसबरोबर जाण्यास कुणी भाग पाडलं? भाजपबरोबर आम्ही 25 वर्षे होतो. ही जगातील एकमेव युती असेल जी इतकी वर्षे हिंदुत्वासाठी होती. ही युती सगळ्यात आधी भाजपनेच तोडली. आपल्यातील काही लोक गळ्यात पट्टा बांधून तिकडे गेले आहेत. तसा पट्टा माझ्या गळ्यात बांधणार अजून कुणी पैदा झाला नाही आणि होणारही नाही.

Exit mobile version