Kirit Somaiya on Chatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhaji Nagar Riots) येथील किराडपुरा परिसरात दोन गटांत तुफान हाणामारी झाली. दगडफेक करत दोन गट एकमेकांना भिडले. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असली तरी राजकारणाला मात्र उकळी फुटली आहे. या दंगलीवरून खासदार संजय राऊत यांनी आज सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मोर्चा सांभाळला आहे.
राऊत काही दिवसांपासून राज्यात दंगली होतील. दंगल घडविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असे वक्तव्य वारंवार करत होते. त्यावर सोमय्या म्हणाले, ‘राऊत म्हणत होते दंगे होणार आहे मग, ते हेच दंगे आहेत का ?’ असा सवाल त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.
ते म्हणाले, मी पुन्हा एकदा सांगतो संजय राऊत हे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावतीने सांगत होते. आता पुढे दंगलीच सुरू होणार आहेत. ही जी दंगल आहे ती त्यातील आहे का ?, असा सवाल त्यांनी केला.
Amit Shah ‘खरी शिवसेना आमच्यासोबत, सत्तासंघर्षांवर अमित शाह यांचं मोठं वक्तव्य
दरम्यान, या दंगलीच्या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांत आज सकाळपासूनच जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. दोन्ही गटांतील नेते त्वेषाने एकमेकांवर आरोप करत आहेत. खासदार संजय राऊत यांनीही सरकारला घेरले आहे.
राऊत म्हणाले, की राज्यात दंगली घडाव्यात अस्थिरता रहावी असे काम सरकार करत आहे. सरकारचा तोच हेतू आहे. राज्यात असेच वातावरण रहावे अशी सरकारची इच्छा असून त्यासाठी मिंधे गटाच्या टोळ्या काम करत आहेत असा आरोप राऊत यांनी केला.
छ. संभाजीनगर दंगलीनंतर फडणवीसांचे खैरे अन् दानवेंकडे बोट, म्हणाले, नेत्यांनी…
गृह मंत्रालय अस्तित्वात आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. गृहमंत्री फडणवीस वैफल्यग्रस्त अवस्थेत काम करत आहेत. यामागे काय कारणे आहेत त्यांचा शोध घेतला पाहिजे. मात्र, ही कारणे सांगता येण्यासारखी नाहीत असा टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला होता.