Amit Shah ‘खरी शिवसेना आमच्यासोबत, सत्तासंघर्षांवर अमित शाह यांचं मोठं वक्तव्य

Amit Shah ‘खरी शिवसेना आमच्यासोबत, सत्तासंघर्षांवर अमित शाह यांचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये आम्ही आणि शिवसेना (Shiv Sena) एकत्र निवडणूक लढलो आहे. खरी शिवसेना आमच्यासोबत आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) नेतृत्वात निवडणूक लढवण्यात आली. जर भाजप एकटी लढली असती तर संपूर्ण बहूमत मिळालं असतं. (Maharashtra Politics) पण शिवसेना पक्षासोबत जुनी नातेसंबंध आहेत, म्हणून त्यांच्याबरोबर युती केली, असल्याच मोठं विधान भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी केलं.

नेटवर्क 18 च्या वतीने रायझिंग इंडिया हा कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये त्यांनी हे विधान केलं आहे. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शहा यांची नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये अमित शहा यांनी राजकीय घडामोडींवर परखड भाषेत उत्तर दिले आहे.

‘आमच्यासोबत खरी शिवसेना आहे जी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. त्याचबरोबर ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी केवळ भाजपशीच विश्वासघात केला नाही तर विचारधारेशीही विश्वासघात केला आणि महाराष्ट्रातील जनतेच्या जनादेशाचाही अवमान केला. उद्धव ठाकरेंचा पक्ष लहान असण्याचे कारण म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे आणि त्यांना सत्तेची हाव, भाजप नाही. राजकारणात फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. अमित शहा म्हणाले की, आज मला पुन्हा सांगायचे आहे की, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन आम्ही कधीच दिले नव्हते. असे यावेळी त्यांनी सांगितलं आहे,

महाराष्ट्रात आम्ही आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढलो. खरी शिवसेना आमच्यासोबत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणूक लढलो. यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, पण जनतेत गेले तेव्हा त्यांच्यामध्ये वैचारिक मतभेद दिसायला लागले होते. ठाकरे गटाचे आमदार पळाले ते आमच्यामुळे नाही तर जनतेच्या दबावामुळे पळाले होते. खरी शिवसेना आमच्याबरोबर एकत्र आली आहे. आगामी निवडणूक एकत्र लढवू आणि जिंकू.

1 एप्रिलपासून ‘या’ अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार

आगामी निवडणुकीमध्ये 2024 मध्ये शिवसेनेबरोबर जागावाटपाविषयी आमची चर्चा अजून झाली, पण एकत्रच लढणार, असा गौप्यस्फोट अमित शहांनी यावेळी केला.  सगळे कुठे एकत्र आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध करण्यासाठी सगळे एकत्र येत आहेत. पण पश्चिम बंगालमध्ये काय करणार ? दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल जागा सोडणार का ? असा प्रश्न देखील शहांनी केला. कर्नाटकात निवडणूक जाहीर झाली. बोम्मई परत एकदा मुख्यमंत्री होणार का नाही, ते पार्टी ठरवणार आहे. यावर मी भाष्य करणे चुकीचे असल्याचे यावेळी सांगितले. कर्नाटकच्या जनतेला डबल इंजिन सरकार हवं आहे. मोदींच्या योजनेला कर्नाटकात इंम्पलिमेंट करण्याकरिता तिकडे भाजपचे सरकार गरजेचं आहे.

कर्नाटकात भाजप पक्षाला पूर्ण बहुमतात येणार आहे, असंही शहा यावेळी म्हणाले.  चंद्रशेखर राव, तृणमूल काँग्रेस, समाजवादी आणि काँग्रेस या ४ पक्षाची नरेंद्र मोदी विरुद्ध सगळे एकत्र आहेत तर, चंद्रशेखर राव यांची उत्तर प्रदेशमध्ये सभा ठेवली तर कोणता फरक पडणार ? ममतांची सभा तेलंगणामध्ये ठेवली तर कोणता फरक पडणार ? यादव साहेबांची सभा बंगालमध्ये ठेवली तर कोणता फरक पडणार ? हे सगळे त्यांच्या त्यांच्या राज्यात भाजपच्या विरोधात लढत आहेत. कोणीही एकमेकांना नेता मानत नाही आणि एकमेकांना जागा द्यायला तयार नाहीत. ममता, चंद्रशेखर राव आणि यादव यांनी एकमेकांना ५-५ सीट देऊन दाखवावे, असा खोचक टोला अमित शहांनी यावेळी लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube