Download App

14 जणांच्या मृत्यूनंतर सरकारला शहाणपण; ‘त्या’ दुर्घटनेनंतर घेतला मोठा निर्णय, वाचा..

Maharashtra Govt Decision on Heat Stroke : खारघर येथील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने (Heat Stroke) मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 14 वर पोहोचली आहे. रणरणत्या उन्हात तासनतास बसल्याने अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यातच 14 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर सात जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर आता राज्य सरकारला उपरती झाली असून सरकारने काही महत्वाचे निर्देश दिले आहेत.

या पुरस्कार सोहळ्यात दगावलेल्या श्री सदस्यांचा खरा आकडा वेगळाच आहे. सरकार मृत्यूंची संख्या लपवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यानंतर आता सरकारने नरमाईचे धोरण घेत एक मोठा निर्णय घेतला आहे.

भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; ‘या’ स्टार खेळाडूंचा समावेश

या कार्यक्रमाची वेळ निवडण्यात चूक झाल्याचे आता सांगितले जात आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

भरदुपारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे दुपारच्या वेळी मोकळ्या जागेत कोणतेही कार्यक्रम घेऊ नयेत अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. जोपर्यंत उन्हाची स्थिती आहे तोपर्यंत दुपारच्या वेळात असे कार्यक्रम घेऊ नयेत.
दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत खुल्या जागेत कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत, हा निर्णय चांगला आहे. लोकांनीही त्याचे पालन करावे असे आवाहन लोढा यांनी यावेळी केले.

Ajit Pawar : ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यातील आपत्ती सरकार निर्मित, अजित पवारांचं सरकारला पत्र

काय घडलं होतं ?

ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने रविवारी गौरवण्यात आलं. खारघर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. मात्र या कार्यक्रमाला गालबोट लागले. या सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील 14 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.काही रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत.

 

Tags

follow us