Download App

Maharashtra Budget 2023 : गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा योजना आता राज्य सरकार चालवणार

Maharashtra Budget :  महाराष्ट्र राज्याचा  अर्थसंकल्प आज सादर होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री  देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis )  हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी अपघातग्रस्त शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणारी गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून राबवण्यात येणार असे सांगितले आहे. याआधी ही योजना फक्त विमा कंपन्यांकडून राबवण्यात येत होती.

Live Blog | नदीजोड प्रकल्प, शेतीसाठी मोठ्या घोषणा, अर्थसंकल्पातील संपूर्ण घोषणा वाचा एका क्लिकवर

गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून राबवण्यात येणार आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होणारा  लाभही 2 लाखांपर्यंत मिळणार असल्याचे राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. ही योजना राज्य सरकार राबविणार असल्यामुळे शेतकर्‍यांचा पूर्ण त्रास वाचणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. यापूर्वी अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना 1 लाखांपर्यंत मदत दिली जात होती. ती आता 2 लाखांपर्यंत दिली जाणार असल्याच फडणवीस यांनी सांगितले आहे.

तसेच वीज ट्रान्सफॉर्मर नसल्याने पाणी असूनही शेतकर्‍यांची गैरसोय होते. ती  टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर योजना आणणार असे फडणवीसांनी सांगितले आहे.  मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत हेक्टरी 75,000 रुपये वार्षिक भाडेपट्टा देण्यात येणार आहे.याचबरोबर दिवसा वीजपुरवठ्यासाठी 3 वर्षांत 30 टक्के कृषी वीजवाहिन्यांचे सौर उर्जीकरण केले जाणार आहे. यामुळे राज्यातील  9.50 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

Tags

follow us