live now
Live Blog | नदीजोड प्रकल्प, शेतीसाठी मोठ्या घोषणा, अर्थसंकल्पातील संपूर्ण घोषणा वाचा एका क्लिकवर
राज्यात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यापासूनचा पहिला अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडत आहेत. राज्याचे अर्थमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस पहिला अर्थसंकल्प मांडला.
पुढील वर्षातील निवडणूका पाहता अर्थसंकल्पातून सर्व घटकांना खुश करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याशिवाय शेतीसाठीही त्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत.
अर्थसंकल्पातील घोषणा आणि इतर अपडेट पहा एका क्लिकवर
LIVE NEWS & UPDATES
-
सुप्रीम कोर्टाचा निकाल काय लागणार हे बहुदा आधीच कळलेलं दिसतंय.
मला तर वाटलं, अर्थसंकल्प ऐकताना त्यांना 14 मार्च तारीख समोर दिसत होती. सुप्रीम कोर्टाचा निकाल काय लागणार हे बहुदा आधीच कळलेलं दिसतंय. त्यामुळे जोरदार घोषणा केल्या आहेत.
अजित पवार यांची फडणवीस यांनी सादर केलेल्या बजेटवर टीका.
-
७ दिवसात ४० हजार सूचना
यंदाचा अर्थसंकल्प हा जनभागीदारीतून तयार केलेला पहिला अर्थसंकल्प आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सूचना मागवल्यानंतर ७ दिवसात ४० हजार सूचना आल्या
-
मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी
- श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन क रणार
- विश्वकोष कार्यालय वाई (सातारा), मराठी भाषा भवन, ऐरोली येथे इमारतींची कामे
- मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी मराठी भाषा युवक मंडळे
- सांगली नाट्यगृहासाठी 25 कोटी रुपये
- राज्यातील सर्व नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी : 50 कोटी रुपये
- दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव, कोल्हापूर चित्रनगरी येथे आंतरराष्ट्रीय सुविधांसाठी : 115 कोटी रुपये
- कलाकार आणि कलाप्रकार जतनासाठी महाराष्ट्र कलाकार कल्याण मंडळाची स्थापना
- विदर्भ साहित्य संघाला शताब्दीनिमित्त : 10 कोटी रुपये
- स्व. शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी आता 50 कोटी रुपयांचा
-
राज्यातील विविध धार्मिक क्षेत्रांचा विकास
- श्री संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्र विकास : 500 कोटी रुपये
- भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी : 300 कोटी रुपये
- श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधीकरण : 50 कोटी रुपये
- श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ, ऋणमोचन विकासासाठी : 25 कोटी रुपये
- श्री चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण विकासासाठी भरीव निधी
- प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज स्मारकासाठी भरीव निधी
- गहिनीनाथ गडाच्या संवर्धन-विकासासाठी : 25 कोटी रुपये
- श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी, नागपूर: 6 कोटी रुपये
- श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ, सुदुंबरे (पुणे) : 25 कोटी रुपये
-
राज्यातील विविध स्मारकासाठी घोषणा
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदूमिल स्मारक : 349 कोटी रुपये दिले/आणखी 741 कोटी रुपये देणार
- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तुळापूर आणि वढूबुद्रूक स्मारकांसाठी निधी
- भिडेवाडा (पुणे) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक: 50 कोटी रुपये
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाटेगाव (सांगली) स्मारक : 25 कोटी रुपये
- हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक : 351 कोटी रुपये
- स्व. रा. सू. गवई स्मारक, अमरावती : 25 कोटी रुपये
- विचारवंत कै. नरहर कुरुंदकर स्मारक, नांदेडसाठी निधी
- स्व. शिवाजीराव देशमुख स्मारक, कोकरुड (सांगली) : 20 कोटी रुपये
-
निर्मलवारीसाठी 20 कोटी निधी
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताई निर्मलवारीसाठी : 20 कोटी
- कीर्तनकार, प्रवचनकार, निरुपणकार यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचा सन्मान: श्री संत नामदेव महाराज कीर्तनकार सन्मान योजना
-
अपराधसिद्धतेत वाढीसाठी योजना
अपराधसिद्धतेत वाढीसाठी योजना
- न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांचे बळकटीकरण
- न्यायवैद्यक विज्ञान महाविद्यालय स्थापन करणार
- 45 ठिकाणी अत्याधुनिक न्यायसहाय्यक मोबाईल युनिट
- मुंबईत सीसीटीव्ही टप्पा-2 राबविणार
- सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर सुरक्षा प्रकल्प
- राज्यात दोन नवीन कारागृह
- देवनार मानखुर्द येथे 500 क्षमतेचे बालसुधार गृह
- 12,793 कोतवालांचे मानधन सरसगट 15 हजार रुपये
-
जुनी शासकीय वाहने निष्कासित करणार
- 15 वर्ष जुनी शासकीय वाहने निष्कासित करणार
- 8 ते 15 वर्षांत खाजगी वाहने निष्कासित केल्यास नवीन वाहनखरेदीसाठी कर सवलत
- एसटी महामंडळात 5150 इलेक्ट्रीक बसेस
- डिझेलवरील 5000 बसेस द्रवरुप नैसर्गिक वायू इंधनावर परावर्तित करणार
- पर्यावरण सेवा योजनेचा 7500 शाळांमध्ये विस्तार
- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 तलाव संवर्धनाचा कार्यक्रम
- प्रत्येक जिल्ह्यात धार्मिक व औषधी वृक्षांची अमृत वन उद्यानांची निर्मिती
- ग्रामीण भागात कडूनिंब, वड, उंबर, देशी आंबा, बेल असे पंचायतन
- धार्मिक स्थळाच्या परिसरात देवराई
- औषधी व व्यावसायिक वृक्षांच्या प्रजाती संवर्धनासाठी 50 हायटेक रोपवाटिका
- गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात आफ्रिकन सफारी, पक्षी उद्यान यावर्षी
- शिवनेरी (जुन्नर) येथे बिबट सफारी
-
राज्याचे नेट झिरो उत्सर्जन साध्यतेसाठी उपाययोजना करणार
राज्याचे नेट झिरो उत्सर्जन साध्यतेसाठी उपाययोजना करणार
- 20,000 ग्रामपंचायतीत सौर उर्जा प्रकल्प
- भुसावळ येथे 500 किलोवॅटचा हरित हायड्रोजन प्रकल्प, सौर उर्जेचा वापर करणार
- जायकवाडी नाथसागर जलाशयात तरंगत्या सौरउर्जा पॅनेलद्वारे वीजनिर्मिती
- शैवाळ शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यासगट
- हरित हायड्रोजन, हरित अमोनिया, सौर, पवन उर्जा क्षेत्रात 75,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित
-
नवीन पाच महामंडळांची घोषणा, प्रत्येक महामंडळाला मिळणार ‘एवढा’ निधी
Maharashtra Budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे विधानसभेत सादर करत आहेत. यावेळी त्यांनी सांगितले राज्यात भरीव निधी देऊन नवीन पाच महामंडळांची स्थापना करण्यात येणार आहे. या महामंडळांना प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.
Maharashtra Budget 2023 : नवीन पाच महामंडळांची घोषणा, प्रत्येक महामंडळाला मिळणार ‘एवढा’ निधी