Download App

Maharashtra Budget 2023 : अर्थसंकल्पात घुमली संत तुकोबांची वाणी; अभंगांचा दाखला देत फडणवीसांच्या घोषणा

Maharashtra Budget 2023 :  राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना आज विधिमंडळात संत तुकाराम महाराजांचे अभंग ऐकण्यास मिळाले. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पाची सुरुवात तुकोबांच्या अभंगाने केली. आज तुकाराम बीज. तेव्हा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे पिकवावे धन | ज्याची आस करी जन || या तत्वास अनुसरून हा अर्थसंकल्प असल्याचे सांगितले.

अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी, घोषणांची माहिती देतानाही त्यांनी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत गाडगेबाबा यांच्या वचनांचा आधार घेतला.

नाचू कीर्तनाचे रंगी..|

आम्ही सारे वारकरी..

या वाणीचा उद्घोष करत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताई निर्मलवारीसाठी 20 कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा करण्यात आली.

वाचा : Maharashtra Budget : विमानतळ, मेट्रो, रिंग रोड आणि. बजेटमध्ये पुण्याला काय काय मिळाले?

फडणवीस यांनी पंचामृत योजनांचा उल्लेख केला. याबाबत माहिती देतानाही त्यांनी अभंगांचा दाखला दिला. अमृतकाळातील हा पहिला अर्थसंकल्प असून पंचामृत ध्येयावर आधारीत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी तसेच त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी नमो शेतकरी अन्नदान योजनेची घोषणा फडणवीस यांनी केली.

लाडकी लेक मी संतांची |

मजवरी कृपी बहुतांची ||

या तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीचा दाखला देत फडणवीस यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारकडून आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.

Maharashtra Budget 2023 : अहमदनगर जिल्ह्याला काय मिळाले ? पाहा

‘सकळांसी येथ आहे अधिकार’  या  तुकाराम महाराजांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे सरकारकडून सर्व समाजघटकांचा विचार अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी सरकारकडून काही योजना सुरू करण्यात येणार आहेत. सरकारने अर्थसंकल्पात काय नियोजित केले आहे याची माहिती दिली. संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ‘झाडे झुडे जीव सोईरे पाषाण..’ यानुसारच आता पर्यावरणाचा विकास सरकार करणार आहे. ‘स्वप्नीही दुःख थोडीही न देखवे डोळा’ हीच तुकाराम महाराजांच्या रामराज्याची कल्पना होता.

Maharashtra Budget 2023 : घोषणांचा पाऊस; सर्वच क्षेत्रासाठी भरीव निधी

दुरितांचे तिमिर जाओ | विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ||

जो जे वांछिल तो ते लाहो | प्राणिजात ||

या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानातील वचनाप्रमाणे आजच्या अर्थसंकल्पाचा संदेश आहे. हीच आमची प्रामाणिक भावना आहे, आणि तशीच कृती राज्य सरकारकडून होईल, असे स्पष्ट करत फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण केले.

Tags

follow us