Download App

Maharashtra Budget 2023 : अहमदनगर जिल्ह्याला काय मिळाले ? पाहा…

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : उपमुख्यंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केला शिक्षण, शेती, पायाभूत सुविधांसाठी भरघोस तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने तीन मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. तर शिर्डी विमानतळासाठी ही मोठी तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारने मेंढी-शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला असून याचे मुख्यालय नगर जिल्ह्यात राहणार आहे. त्यामुळे नगर जिल्ह्याच्या विकासासाठी हे तीन निर्णय महत्त्वाचे आहेत.

पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहमदनगर जिल्ह्यात हे महाविद्यालय मिळत आहे. याशिवाय विखे पाटील यांनी पूर्वीच सुतोवाच केलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करीत असल्याची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

Maharashtra Budget 2023 : घोषणांचा पाऊस; सर्वच क्षेत्रासाठी भरीव निधी 

गोवंश विकासासाठी उपाययोजना

देशी गोवंशाचे संवर्धन, संगोपन, संरक्षणासाठी यासाठी हा आयोग आहे. आयोगामार्फत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना, गोमय मूल्यवर्धन योजना राबविण्यात येणार आहे. देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी भ्रूण बाह्यफलन, प्रत्यारोपण सुविधेत वाढ करण्यासाठी उपाययोजना राबविली जाणार आहे.

शिंदे-फडणवीसांचा अर्थसंकल्प हा गाजर हलवा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

या शिवाय यंदाच्या अर्थसंकल्पात धनगर समाजासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार येणार आहे. त्याचे मुख्यालय अहमदनगरला असणार आहे. या महामंडळामार्फत 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यासोबतच राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढीपालनासाठी भरीव निधीचीही तरतूद करण्यात आली आहे

Maharashtra Budget 2023 : अर्थसंकल्पात घुमली संत तुकोबांची वाणी; अभंगांचा दाखला देत फडणवीसांच्या घोषणा

तसेच देशातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीतील वाढती पर्यटक संख्या लक्षात घेता या विमानतळावर नवीन टर्मिनल उभारण्यासाठी 517 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

 

 

 

Tags

follow us