Download App

Maharashtra Budget : फडणवीसांची सुप्त इच्छा उद्या होणार पूर्ण; वाचा आत्तापर्यंतचे अर्थमंत्री

Maharashtra Budget :  महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प उद्या  सादर केला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. फडणवीस यांना आधीपासूनच राज्याचे अर्थमंत्री व्हायचे होते. पण ते मुख्यमंत्री झाल्याने त्यांना अर्थमंत्री होता आले नाही. यावेळेस मात्र फडणवीस यांना अर्थसंकल्प सादर करायची संधी मिळाली आहे. आत्तापर्यंत अनेक मातब्बर नेत्यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. या लेखातून आत्तापर्यंत महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री म्हणून कोण-कोणत्या नेत्यांनी सादर केला ते वाचणार आहोत.

1 मे 1960 ते 8 मार्च 1962 या कालावधीमध्ये सदाशिव गोवंद बर्वे यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण होते. त्यांच्यानंतर यशवंतराव चव्हाण हे 8 मार्च 1962 ते  19 नोव्हेंबर 1962 या काळात राज्याचे अर्थमंत्री होते. यानंतर मारोतराव कन्नमराव हे मुख्यमंत्री असताना नासिकराव तिरपुडे यांनी 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963 या कालावधीमध्ये  राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.

त्यांच्यानंतर शंकरराव चव्हाण हे 25 नोव्हेंबर 1963 ते 4 डिसेंबर 1963 या कालावधीत अर्थमंत्री होते. तेव्हा पी. के. सावंत हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री असताना ए. आर. अंतुले हे 5 डिसेंबर 1963 ते 1 मार्च 1967 या कालावधीत राज्याचे अर्थमंत्री होते. तेव्हा त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.

यानंतर महिला अर्थमंत्री म्हणून प्रतिभाताई पाटील या 1 मार्च 1967 ते 13 मार्च 1972 या राज्याच्या अर्थमंत्री होत्या. तेव्हा देखील वसंतराव नाईक हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्यानंतर वसंतदादा पाटील हे 13 मार्च 1972 ते 20 फेब्रुवारी 1975 हे सुद्धा वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना अर्थमंत्री होते.

एम. डी. चौधरी हे 21 फेब्रुवारी 1975 ते 16 एप्रिल 1977 याकाळात अर्थमंत्री होते. तेव्हा शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते. त्यानंतर वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असताना यशवंतराव मोहिते हे 17 एप्रिल 1977 ते 6 मार्च 1978 या काळात अर्थमंत्री होते. पुढेही 7 मार्च 1978 ते 18 जुलै 1978 या काळात मोहिते हेच अर्थमंत्री होते.

‘माझ्यावर टीका करणाऱ्यांनी बांधावर जावे’; ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला

त्यानंतर बीड जिल्ह्यातील सुंदरराव सोळंके हे 18 जुलै 1978 ते 18 फेब्रुवारी 1980 या काळात अर्थमंत्री होते. तेव्हा शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते. यानंतर रामराव आदिक हे 9 जून 1980 ते 12 जानेवारी 1982 या काळात ए. आर. अंतुले हे मुख्यमंत्री असताना अर्थमंत्री होते. त्यानंतर बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री असताना व्ही. सुब्रमण्यम हे 13 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983 या काळात अर्थमंत्री होते.

पुढे वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असताना 7 फेब्रुवारी 1983 ते 5 मार्च 1985 याकाळात सुशीलकुमार शिंदे हे अर्थमंत्री होते. तेव्हा त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. पुढेही 12 मार्च 1985 ते 1 जून 1985 शिंदे हेच अर्थमंत्री होते. यानंतर शिवाजीराव पाटील निलंगेकर हे मुख्यमंत्री असताना 4 जून 1985 ते 6 मार्च 1986 या काळात देखील शिंदे हेच अर्थमंत्री होते.

आ. धसांना फडणवीसांचा धक्का, इनामी जमिनीचे चार महिन्यांत चौकशीचे आदेश

यानंतर शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री असताना 12 मार्च 1986 ते 26 जून 1988 या काळात सुशीलकुमार शिंदे हेच अर्थमंत्री होते. पुढेही शरद पवार हे मुख्यमंत्री असताना 26 जून 1988 ते 3 मार्च 1990 या काळात शिंदे हेच अर्थमंत्री होते. यानंतर शरद पवार हे मुख्यमंत्री असताना 4 मार्च 1990 ते 24 जून 1991 या काळात शरद पवारांकडेच अर्थखाते होते.

यानंतर सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री असताना रामराव आदिक हे 25 जून 1991 ते 22 फेब्रुवारी 1993 या काळात अर्थमंत्री होते. पुढे शरद पवार हे मुख्यमंत्री असताना 6 मार्च 1993 ते 14 मार्च 1995 या काळात अर्थखाते हे त्यांच्याचकडे होते.

यानंतर 14 मार्च 1995 ते 18 नोव्हेंबर 1995 या काळात हशू अडवाणी हे अर्थमंत्री होते. तेव्हा मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते. पुढे 18 नोव्हेंबर 1995 ते 17 ऑक्टोबर 1999 या काळात एकनाथ खडसे हे अर्थमंत्री होते. त्यानंतर नारायण राणे हे मुख्यमंत्री असताना 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999 या काळात खडसे हेच अर्थमंत्री होते.

पिके भुईसपाट, भाव नसल्याने कोथिंबीर फुकट.. शेतकऱ्यांना काय मदत करणार सांगा ? ; अजितदादांनी विचारला जाब

यानंतर जयंत पाटील हे 27 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2003 या काळात अर्थमंत्री होते. तेव्हा विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते. पुढे सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री असताना 27 डिसेंबर 2003 ते 19 ऑक्टोबर 2004 याकाळात अर्थखाते हे त्यांच्याचकडे होते. यानंतर पुन्हा 1 नोव्हेंबर 2004 ते 4 डिसेंबर 2008 या काळात जयंत पाटील हे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना अर्थमंत्री होते.

यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना 8 डिसेंबर 2008 ते 6 नोव्हेंबर 2009 या काळात दिलीप वळसे पाटील हे अर्थमंत्री होते. नंतर 7 नोव्हेंबर 2009 ते नोव्हेंबर 2010 या काळात सुनिल तटकरे हे अर्थमंत्री होते. पुढे 11 नोव्हेंबर 2010 ते 25 सप्टेंबर 2012 या काळात अजित पवार हे अर्थमंत्री होते. यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना 25 सप्टेंबर 2012 ते 7 डिसेंबर 2012 याकाळात चव्हाण यांच्याकडे अर्थखाते होते. पुढे अजित पवार हे 7 डिसेंबर 2012 ते 16 सप्टेंबर 2014 या काळात ते अर्थमंत्री होते.

यानंतर 31 ऑक्टोबर 2014 ते 8 नोव्हेंबर 2019 या काळात सुधीर मुनगंटीवार हे अर्थमंत्री होते. तेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. यानंतर 28 नोव्हेंबर 2019 ते 30 डिसेंबर 2019 याकाळात अर्थखाते हे जयंत पाटील यांच्याकडे होते. त्यानंतर 30 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022 या काळात अजित पवार हे अर्थमंत्री होते. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस 14 ऑगस्ट 2022 पासून राज्याचे अर्थमंत्री आहेत.

Tags

follow us