Eknath Shinde : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. राहुल गांधींच्या शिक्षेचे त्यांनी समर्थन केले. ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल यांनी एकदा तरी अंदमानातल्या सेल्युलर जेलमध्ये जाऊन रहावे म्हणजे त्यांना कळेल की त्यांनी किती यातना सहन केल्या.’
‘राहुल गांधी म्हणतात आज लोकशाही धोक्यात आली. पण मी त्यांना सांगू इच्छितो, की तुम्ही देशात भारत जोडो यात्रा काढली. काश्मीरात जाऊन तिरंगा फडकावला ही संधी तुम्हाला कुणामुळे मिळाली ?, तर मोदी यांच्या नेतृत्वात गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी तेथील 370 कलम हटविल्यामुळे. बाळासाहेबांचे स्वप्न होते ते आज कोण पूर्ण करतंय ?, काश्मीरमधील 370 कलम हटवले, राम मंदिराचे काम सुरू आहे. आता लवकरच मंदिरही पूर्ण होईल. हे ज्यांनी केले त्यांच्याबरोबर आम्ही गेलो.’
वाचा : Eknath Shinde म्हणतात.. सत्तेची खुर्ची मिळवणं एकवेळ सोपं, पण
‘अमित शहांना तुम्ही मोगॅम्बो म्हणता. पण, मोगॅम्बो कोण तर मिस्टर इंडिया चित्रपटातला तो व्हिलन होता. आज बाळासाहेब असते तर अमित शहांना मिस्टर इंडिया म्हटले असते. त्यांचा सन्मान केला असता पण बाळासाहेब.. जाऊ द्या त्याला मोठं मन लागतं, ‘कद्रूपणा’ चालत नाही असे शिंदे म्हणाले. त्यानंतर काही वेळ थांबून विधानसभा अध्यक्षांकडे पाहत म्हणाले, संसदीय शब्द आहे ना हा, त्यावर अध्यक्षांनीही हसत उत्तर दिले तपासून पाहू.. त्यानंतर सभागृहातील सगळेच सदस्य हसू लागले.
माणुसकीच्या यादीत माझे नाव
हे सरकार गरीबांसाठी कष्टकऱ्यांसाठी अहोरात्र काम करणारे सरकार आहे. प्रत्येकाला मदत करण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे श्रीमंतांच्या यादीत जरी नाही आले तरी माणुसकीच्या यादीत माझे नाव नक्की येईल असे शिंदे म्हणाले.
Eknath Khadse : मंत्री सुरत अन् गुवाहाटीत पण नाही; खडसेंचा खोचक सवाल
तुमच्यासारखे राहिलो असतो तर एक रुपयाही मिळाला नसता
आता आपल्याकडे पंतप्रधान येतात गृहमंत्री येतात भरपूर निधीही मिळतो. पण, आम्ही तिकडे जातो म्हणून ते इकडे येतात. तुम्हाला कुणी अडवले होते असा सवाल करत आम्ही जातो म्हणून आम्हाला मिळतात. तुमच्यासारखे कडकशीन झालो असतो तर एक रुपयाही मिळाला नसता, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
हा एकनाथ शिंदे कामातून बोलणार
सध्या सरकारवर अनेक आरोप होत आहेत. सरकावर कितीही आरोप करा त्याने काही फरक पडत नाही. शेवटी या आरोपांना हा एकनाथ शिंदे त्याच्या कामातूनच उत्तर देणार असे मुख्यमंत्री शिंदे यांनी ठणकावून सांगितले.