Mumbai : आदिवासी समाजात घुसखोरीचे प्रमाण जास्त आहे. या घुसखोरांमुळे मूळ आदिवासींवर अन्याय होत आहे. नोकऱ्या आणि विविध शिक्षणाच्या प्रवेशात आदिवासींवर अन्याय होत आहे, असे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार डॉ. किरण लहामटे (kiran Lahamate) यांनी सरकारला काही प्रश्न विचारले.
आ. लहामटे यांनी आज विधिमंडळ अधिवेशनात आदिवासी समाजावरील अन्यायाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, की आदिवासी समाजात घुसखोरीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मूळ जे आदिवासी आहेत. त्यांच्यावर अन्याय होत आहे. सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज असून काही ठोस कारवाई करावी. यासाठी मी सरकारला तीन मागण्या करणार आहे.
वाचा : लाँगमार्च आंदोलन : Eknath Shinde शेतकरी, आदिवासींना काय म्हणाले ?
सरकारने नुकतेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात वैधता प्रमापणत्र अनिवार्य केले आहे. त्याच पद्धतीने अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सुद्धा जात प्रमाणपत्र बंधनकारक करणार का , आतापर्यंत ज्यांनी बोगस फायदा घेतला आहे म्हणजे ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र खोटे आहे त्या आधारावर व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांत प्रवेश घेतला त्यांच्यावर आपण कारवाई करणार का आणि ही कारवाई किती दिवसात करणार असे प्रश्न आमदार लहामटे यांनी उपस्थित केले.
Sharad Pawar : आदिवासींना वनवासी बोलणे हा आदिवासींचा अपमान
दरम्यान, आज विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांनी विविध मुद्द्यांवर सरकारला घेरले आहे. वाढत्या महागाईच्या विरोधात आज विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पुन्हा विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणा देत आंदोलन केले. हातात गुढी घेऊन उद्योग चालले बाहेर, वाढती बेरोजगारी; सरकारा गुढी घरी उभारू की शेजारी ? अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली.