Download App

प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अपघात ? ; अभ्यासक पेंडसेंनी केली ‘ही’ मागणी

Accident on Pune Mumbai Highway : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एक खासगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 20 ते 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातावरून रस्ता सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने येथे काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत.

या महामार्गावर ज्या ठिकाणी दरी आहेत तेथे जर संरक्षक कठडे असते तर कदाचित ही दुर्दैवी घटना घडली नसती असे आता सांगितले जात आहे. नवीन मुंबई पुणे एक्सप्रेस मार्ग असला तरी येथील वाहतूक कोंडीमुळे पुन्हा जुन्या महामार्गाकडे वाहतूक वळत आहे. त्यामुळे येथे प्रशासनाने पर्याप्त उपाययोजना करण्याची मागणी पुढे येत आहे.

काळाचा घाला, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात, 11 जणांचा जागीच मृत्यू

याबाबत महामार्ग वाहतूक अपघातांचे अभ्यासक तन्मय पेंडसे यांनीही प्रशासनाने येथे उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, आजची अपघाताची घटना अत्यंत दुःखद आहे. रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाला काम करावे लागणार आहे. मी त्या रस्त्याने काही दिवसांपूर्वी गेलो होतो. त्यावेळी तेथे ज्या ठिकाणी दरी आहेत. तेथे बॅरिअर्स (संरक्षक कठडे) लावलेले आढळले नाहीत. रम्बलर्सही नव्हते. प्रशासनाने याकडे खूप गांभीर्याने बघितले पाहिजे.

या रस्त्यावर आता अवजड वाहनांची संख्या वाढली आहे. नव्या एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी होत असल्याने लहान वाहने सुद्धा पुन्हा या जुन्या महामार्गाचा वापर करू लागली आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता गांभीर्याने घेतले पाहिजे.

Mumbai-Pune Highway accident : अपघाताची पाहणी करताच मुख्यमंत्री शिंदेनी घेतला मोठा निर्णय

सध्या अत्यंत आवश्यक म्हणजे, दरी आहे तेथे तत्काळ ट्रॅक बॅरिअर्स बसले गेले पाहिजेत. तसेच अन्य आवश्यक उपाययोजनाही प्रशासनाने करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags

follow us