Maharashtra Cabinet Expansion : राज्यामध्ये शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्या मंत्रीमंडळ विस्ताराची कायम चर्चा सुरु आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री व उपमुख्यंत्री हेच फक्त काम करत होते. यानंतर 17 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. हे सर्व कॅबिनेट मंत्री आहेत. परंतू राज्याचा कारभार चालविण्यासाठी एवढेसे मंत्रीमंडळ पुरेसे नसल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येतो. त्यातही सध्याच्या मंत्रीमंडळामध्ये एकही महिला मंत्री नसल्याने यावरुनदेखील सरकारवर टीका करण्यात येते.
काही दिवसांपूर्वी सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला. त्यामुळे राज्यातील मंत्रीमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमध्ये राज्यातील मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
‘आम्हाला गृहीत धरू नका, 23 जागा आमच्याच’; सावंंतांचा भाजपला इशारा
त्यानुसार भाजपचे सहा व शिवसेनेचे चार मंत्री शपथ घेणार अशी माहिती आहे. भाजपच्या सहापैकी चार जण हे कॅबिनेट पदाची तर दोन जण हे राज्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी माहिती आहे. हा छोटेखानी विस्तार असेल अशी माहिती समोर आली आहे. तसेच शिवसेनेचे आमदार दोन कॅबिनेट तर दोन राज्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे कळते आहे. तसेच उरलेली 13 रिक्त मंत्रिपदे ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये भरली जाण्याची शक्यता आहे.
राऊतांवर टीका करतांना गुलाबराव पाटलांची जीभ घसरली, एकेरी उल्लेख करत बाप काढला
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी अमित शाहांची भेट घेतली. शिवसेनेच्या वर्धापनदिनाआधी हा मंत्रिमंडळ विस्तार करायला हवा, असं मत मुख्यमंत्री शिंदेंनी या बैठकीत व्यक्त केल्याचं समजतं. त्याचा अर्थ राज्यात 19 जूनआधी मंत्रिमंडळ विस्तार पाहायला मिळण्याची शक्यता आहे.