Maharashtra Cabinet Meeting : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी यूनिफाइड पेन्शन (UPS) योजना लागू केली आहे. देशात ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे.
तर दुसरीकडे राज्य सरकारने देखील एक मोठा निर्णय घेत राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) देखील उपस्थित होते. याच बरोबर या बैठकीत आणखी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
1. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू. मार्च 2024 पासून अंबालबजावणी . लाखो कर्मचाऱ्यांना फायदा.
2. राज्यातील जास्तीत- जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार. योजनेची व्याप्ती वाढवली.
3. गटप्रवर्तकांच्या मानधनात 4 हजारांची भरीव वाढ.
4. ऑलिंपिकवीर स्व. पै.खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देणार.
5. थकीत देण्यांसाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासन हमी.
6. पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार. पुणे परिसरास सिंचन, पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार.
7. नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्प. 7 हजार 15 कोटीस मान्यता. नाशिक, जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा.
8. सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी.
9. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या 30 ऑगस्टपर्यंत.
✅ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू. मार्च २०२४ पासून अंमलबावणी. लाखो कर्मचाऱ्यांना फायदा.
✅ राज्यातील जास्तीत- जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार. योजनेची व्याप्ती वाढवली.
✅ गटप्रवर्तकांच्या…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 25, 2024
10. ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ. सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ.
11. ठाणे येथील महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी महाप्रित 5 हजार कोटी निधी उभारणार.
12. ‘बार्टी’ च्या ‘त्या’ 763 विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ.
13. मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार. विविध महामंडळे प्रकल्प राबविणार.
14. कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ.
15. कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा, सेवाशुल्क माफ.
16. चिपळूण, रामटेक, इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल.
17. श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना.
18. पाचोऱ्यातील सहकारी सूत गिरणीस शासन अर्थसहाय्य.
Pune Police : पुण्यात पोलीस असुरक्षित? कोयत्या गँगकडून चक्क पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
19. सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन.