Download App

Maharashtra Cabinet Decisions : शिंदे सरकारचा मास्टरस्ट्रोक! वांद्रे-वर्सोवा सागरी सेतुला सावरकरांचं नाव

Maharashtra Cabinet Decisions : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Maharashtra Cabinet Meeting) घेण्यात आली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्य सरकारने राज्यातील काही शहरांची नावे बदलली. त्यानंतर आता सरकारने वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात आले. तसेच एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला.

वांद्र वर्सोवा येथील सागरी सेतुला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. यानंतर विरोधी पक्ष काँग्रेसकडून सातत्याने टीका केली जात होती. ही घोषणा कधी होणार याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. अखेर सरकारने आज हा निर्णय जाहीर करून टाकला. वांद्र वर्सोवा सागरी सेतू आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने ओळखला जाणार आहे. इतकेच नाही तर एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव देण्याचा निर्णयही शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय 

 

Tags

follow us