Download App

ठाकरे गटाला धक्का! आमदार वायकरांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Politics : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. आता परत एकदा मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर, त्यांची पत्नी आणि इतरांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी कालच सुरू झाली आहे. त्यानंतर लगेचच ठाकरे गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल झाल्याने अडचणी वाढल्या आहेत.

मुंबईतील जोगेश्वरी येथील भूखंड आणि हॉटेलच्या बांधकामप्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आमदार वायकर यांनी जोगेश्वरी येथी सुप्रीमो क्लबचा गैरवापर तसेच येथे हॉटेल बांधताना माहिती लपवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे आरोप केले होते. इतकेच नाही तर हॉटेलचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचाही आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर मुंबई महापालिकेने हालचाली करत बांधकामाला स्थगिती दिली होती. या घडामोडींनंतर आमदार वायकर यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र न्यायालयाकडून त्यांना कोणताच दिलासा मिळाला नाही.

काश्मीरात रक्ताचे सडे, राज्यकर्त्यांवर फुलांची उधळण; BJP च्या सेलिब्रेशनवर ठाकरे गटाचा घणाघात 

याबरोबरच रवींद्र वायकर यांच्या भूखंड घोटाळ्याचा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून प्राथमिक तपास करण्यात आला होता. या प्रकरणी रवींद्र वायकर यांचा जबाबही नोंदवण्यात आला होता. त्यामुळे रवींद्र वायकर मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. पण त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यानंतर आता थेट आर्थिक विभागाने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

Tags

follow us