Download App

संभाजीराजे विधानभवनाच्या कॅन्टीनमध्ये हॉट कॉफीसह..

मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. आज संभाजीराजे छत्रपती (Chatrapati Sambhajiraje) विधानभवनात आले. तसे ते याआधीही विधानभवनात आले होते. पण, आज ते आवर्जुन येथील कँटीनमध्ये आले. त्यांच्यासोबत कार्यकर्तेही होते. रायगड किल्ल्याचे सुशोभिकरण आणि दुरुस्तीची रखडलेली कामे आणि निधीबाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार होते. पण, फडणवीस सभागृहात चर्चेसाठी असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही.

या दरम्यान, संभाजीराजे येथील कँटीनमध्ये आले. त्यांनी कॉफीही ऑर्डर केली. त्यांना पाहताच अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढले. येथे कॉफी घेताना नवी मुंबईत होणाऱ्या स्वराज्य पक्षाच्या मेळाव्यासंदर्भात त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर चर्चाही केली.

हे वाचा : आरोग्याचा कारभार सुधारा नाहीतर मी बघून घेईल; संभाजीराजेंचा आरोग्यमंत्र्यांना इशारा 

छत्रपती संभाजीराजे यांची राज्यसभेवरील निवड हुकल्यानंतर ते पहिल्यांदाच विधिमंडळाच्या कॅन्टीनमध्ये आले. संभाजीराजे यांच्या राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरूनच उद्धव ठाकरे सरकारभोवती संकटाचे ढग निर्माण झाले होते. त्यानंतर काही दिवसातच हे सरकार गडगडले.

आता संभाजीराजे स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून पुन्हा राजकीय जम बसविण्याच्या तयारीत आहेत. देवेंद्र फडणीस यांची भेट घेणे हा त्याचा तर भाग नाही ना अशी चर्चाही यानिमित्ताने सुरू झाली आहे.

Sambhaji Raje : संभाजीराजे 2024 च्या तयारीला, पदाधिकाऱ्यांची निवड करत रणशिंग फुंकले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल राज्य सरकार मोठा उत्सव साजरा करणार आहे. त्यासाठी सरकारने तयारीही सुरू केली आहे. यामध्ये राज्य सरकार छत्रपती संभाजीराजे यांना सहभागी करून घेणार की नाही हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us