आरोग्याचा कारभार सुधारा नाहीतर मी बघून घेईल; संभाजीराजेंचा आरोग्यमंत्र्यांना इशारा

  • Written By: Published:
आरोग्याचा कारभार सुधारा नाहीतर मी बघून घेईल; संभाजीराजेंचा आरोग्यमंत्र्यांना इशारा

धाराशिव : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje Bhosale) यांनी आरोग्यमंत्र्याच्या मतदार संघातील आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली. या आरोग्य केंद्रात अनेक सोईसुविधा उपलब्ध नसल्याच आढळून आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. आरोग्याचा कारभार सुधारा नाहीतर मी बघून घेईल, असा इशारा छत्रपती संभाजीराजेंनी आरोग्यमंत्री तानाजी सावंताना (Health Minister Tanaji Sawant) दिला.

धाराशिव येथे संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेच्या ५८ शाखांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या भुम मतदार संघातील आरोग्य केंद्राला भेट दिली. मात्र, आरोग्य केंद्राची दुरावस्था पाहिल्यानंतर त्यांनी आरोग्य यंत्रनेचा पंचनामा करून आरोग्यमंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतला. आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आरोग्य व्यवस्थेचे कसे हाल झाले? भूम येथील रुग्णालय महाराष्ट्रात नंबर वन हवं होतं, मात्र तशी स्थिती नाही, अशी खंत संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.

आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार पाहून त्यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, सर्वसामान्य जनतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हे मोठे आधार वाटत असते. मात्र आरोग्यमंत्र्याच्या मतदार संघातील आरोग्य केंद्रात पायाभूत सुविधांची दुरवस्था आहे. रुग्णालयात डॉक्टर, नर्स याची कमतरता असून अनेक ठिकाणी अस्वच्छता, स्वच्छता गृहात पाणी नाही, अनेक मशीन बंद असून धुळखात पडल्या आहेत. डॉक्टर-कर्मचारी यांच्या निवासस्थाने ओस पडली असून तिथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितले.

‘अजितदादा आम्ही घेत नाही सढळ हाताने मदत करतो’, मुख्यमंत्र्यांचा Ajit Pawar यांना टोला

दरम्यान, संभाजीराजे म्हणाले, आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच प्राथमिक आरोग्य केंद्राची अशी दुरावस्था असेल तर अन्य मतदार संघात काय परिस्थिती असेल? सरकार मोठमोठ्या भरतींची घोषणा करत असते. ते सगळ ठीक आहे. तुम्हाला भरती करायचीच असेल तर आधी आरोग्य विभागाची भरती करा. किमान, आरोग्याचे विषय तरी गांभीर्याने घ्या, अन्यथा मी बघून घेईल असे, अशा शब्दात संभाजीराजे यांनी सरकारला दम भरला आहे. आरोग्य खात्याच्या दुरावस्थेबाबत राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube