‘अजितदादा आम्ही घेत नाही सढळ हाताने मदत करतो’, मुख्यमंत्र्यांचा Ajit Pawar यांना टोला

‘अजितदादा आम्ही घेत नाही सढळ हाताने मदत करतो’,  मुख्यमंत्र्यांचा Ajit Pawar यांना टोला

मुंबई :  राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून मुंबई ( Mumbai ) येथे सुरु झाले आहे. आज अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची प्रश्नाविषयी चर्चा सुरु होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांना चांगलाच टोला लगावला आहे. आमचे सरकार हे घेणारे सरकार नसून सढळ हाताने देणारे सरकार आहे, अशा शब्दात त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

सभागृहामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चर्चा सुरु होती. यावेळी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी बीड जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे सांगितले. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसून याबाबत सरकार काय करत आहे, असा प्रश्न उपस्थित केला. राज्यातील अजूनही फार मोठा वर्ग मदतीपासून वंचित असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसेच राहिलेली मदत कधीपर्यंत वाटप होणार याची माहिती सभागृहाला द्यावी, अशी मागणी पवारांनी केली.

(गळ्यात कांदा अन् कापसाच्या माळा घालत आमदारांची विधानभवनात मांदियाळी)

यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी एनडीआरएफच्या नियमांच्या दुप्पट मदत करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. तसेच सतत पावसामुळे होणाऱ्या नुकसानीचे 755 कोटी रुपये वाटप झाले आहेत. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 50 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचे देखील शिंदेंनी सांगितले. यावर पुढे बोलताना मुख्यमत्री म्हणाले, हे सरकार घेणारे सरकार नाही. हे सरकार दोन्ही हाताने मदत करणारे सरकार आहे, असे म्हणत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.

दरम्यान आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. विरोधी पक्षाने आज सभागृहाच्या पायऱ्यावर जोरदार घोषणाबाजी केली. कापसाला व कांद्याला भाव नसल्याचे विरोधकांनी सांगितले. कांद्याच्या माळा गळ्यात घालून विरोधकांनी आज आंदोलन केले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube