Download App

शिंदे मुख्यमंत्री असतानाही नाराजच होते; हास्य हरवल्याच्या चर्चांवर फडणवीसांचं उत्तर!

उपमुख्यमंत्री झाल्यापासून शिंदे यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत नसल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा आहे.

  • Written By: Last Updated:

नागपूर : उपमुख्यमंत्री झाल्यापासून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या चेहऱ्यावरच हास्य हरवले आहे अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. शिंदेंचा असा पडलेला चेहरा पाहून त्यांच्या चाहत्यांसह अनेकांना शिंदेंच्या चेहऱ्यावरील हास्य गेले कुठे असा प्रश्न पडला होता. अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शिंदेंच्या चेहऱ्यावर दुःख का याचे उत्तर दिले आहे. (CM Devendra Fadnavis On Eknath Shinde Sadness)

“राजकारणात काहीही होऊ शकतं”, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचं सूचक उत्तर

शिंदेंच्या दुःख चेहऱ्यावर काय म्हणाले फडणवीस?

शिंदेंच्या नाराज चेहऱ्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, माझ्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते पण शिंदेंचं व्यक्तीमत्त्व वेगळे आहे. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर उपमुख्यमंत्री व्हायचे की नाही हा एकनाथ शिंदे यांच्यासमोर मोठा प्रश्न होता. यावर त्यांना निर्णय घेण्यास वेळ लागला. त्यामुळे अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आले. त्यावेळी मी शिंदे यांच्याशी चर्चा करून माझा अनुभव सांगितल्याचे फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरे की राज ठाकरे; अजित पवार की एकनाथ शिंदे, रॅपीड प्रश्नांवर फडणवीसांचे ‘फायर’ उत्तरं

सरकारमध्ये आल्यास फायदा होईल

मी शिंदेंना सांगितले की, तुम्हाला पक्ष चालवायचा असून, पक्षाच्या विभाजनानंतर शिवसेना हा नवा पक्ष आहे. अशा स्थितीत सत्तेशिवाय पक्ष चालवणे कठीण होईल. त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये आल्यास ते पक्षासाठी फायदेशीर ठरेल असे पटवून दिले. सरकारमध्ये सामील होण्याचे महत्त्व समजावून सांगितल्यानंतर अखेर शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारण्यास होकार दिल्याचे फडणवीसांनी सांगितले.

CM फडणवीसांनी नरेंद्र मोदींचे वारसदार व्हावे, विजय वडेट्टीवारांकडून कौतुक

मुख्यमंत्री असतानाही शिंदेंच्या चेहऱ्यावर हसू नव्हते कारण… 

एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर हसू का नाही? या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, उपमुख्यमंत्री झाल्यापासून शिंदे यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत नसल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा आहे. पण एकनाथ शिंदे यांचे व्यक्तिमत्त्व तसेच आहे. त्यांच्या चेहऱ्यावर कधीच हसू येत नाही. ते मुख्यमंत्री असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर हसू नव्हते, त्यावेळी ही बाब कुणीच अधोरेखित केली नाही. पण उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील हसू हरवले असून ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. पण त्याचं व्यक्तिमत्त्व तसेचं असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

follow us