2019 साल आले नसते तर कदाचित महाराष्ट्र… देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला
Devendra Fadanvis on Chief Minster: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Debvendra Fadanvis) यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. पहिल्या टर्ममधील मुख्यमंत्रीपदावरून त्यांनी विरोधकांना मिश्किलपणे टोला लगावला. तर 2019 ते 2022 च्या काळात महाराष्ट्राच्या विकासाला खिळ बसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. एक प्रकारे त्यांनी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारवर टीका केली आहे.
मोठी दुर्घटना, प्लांटची चिमणी कोसळली, 30 कामगार अडकले
मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाबाबत फडणवीस म्हणाले, दहा वर्षांत पुलाखालून फार पाणी वाहून गेले आहे. संपूर्ण अनुभवामुळे अधिक परिपक्वता आली आहे. दहा वर्षांपूर्वी मी आलो होतो. तेव्हा अनेक लोक संशयाने बघायचे. हा माणूस मंत्रिपदावरही राहिला नाही आणि थेट मुख्यमंत्री झाला आहे. तर हा काही करू शकेल का ? पाच वर्षांच्या कार्यकाळानंतर आता पुन्हा ज्यावेळेस मुख्यमंत्री झालो. आता तो प्रश्न माझ्यासमोर नाही. लोकांना मी काय करू शकतो आणि माझी क्षमता काय आहे हे बघितलेली आहे. मला असं वाटतंय व्यक्ती म्हणून दहा वर्षांत अनेक आव्हानाचा सामना केला आहे. त्यामुळे परिपक्वता, प्रगल्भता निश्चितपणे झाली आहे. आता आव्हानाची चिंता वाटत नाही. तशी आव्हाने पेलत असताना, सामना करत असताना आपला अजेंडा ढळू द्यायचा नाही. आपल्या अजेंडावर आपण चालत राहायचे आहे, असा माझा प्रयत्न असणार आहे.
खरेदी, मनोरंजन व खाद्यपदार्थाची रेलचेल असलेल्या ‘गोदाकाठ महोत्सवास’ 10 जानेवारीपासून होणार सुरुवात
परंतु दहा वर्षांत 2019 हे साल आले नसते तर कदाचित महाराष्ट्र अधिक पुढे गेला असता. 2019 ते 2024 कालखंडात महाराष्ट्रात काय-काय घडलं हे सांगायला मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. जी विकासाची गती आपण घेतली होती. पण तिला काही प्रमाणात खिळ बसली पण पुन्हा 2022 मध्ये आपण तिला गती दिली आहे. मी दाव्याने सांगतो की अनस्टॉपेबल महाराष्ट्र आपण घडविणार आहोत, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
समृद्धी महामार्गावरून मला वेड्यात काढलं
समृद्धी महामार्गावरील प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “मी जेव्हा समृद्धी महामार्गाचे पहिले सादरीकरण केले. तर माझ्या काही मित्रांसहित अनेकांनी मला वेड्यात काढले होते. असे होणार आहे का? असे रस्ते होतात का? मी राज्यभरातील संपादकांना बोलावून त्यांच्यासमोर सादरीकरण केले होते. त्यावेळी काही संपादकांनी मला कानात सांगितले की, चांगला प्रकल्प आहे. झाला तर बरे होईल. म्हणजे त्यांना माहिती होते की, तो होणार नाही; पण तो झाला.
पुण्यात प्रोजेक्ट करणे कठीण
पुण्यातील प्रोजेक्टबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक गोष्ट सांगतो, पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, उत्पादक राजधानी देखील आहे. ही तंत्रज्ञानाची राजधानी देखील आहे. पण, पुण्यात प्रोजेक्ट करणं फार कठीण आहे, असे ते म्हणाले. त्यावेळी उपस्थित खळखळून हसले. कारण काय आहे, जिथे अनेक बुद्धिवंत लोकं असतात, त्यांच्याकडे इतक्या आयडियाज् असतात. आणि प्रत्येकाला हे दाखवायचं असतं की, दुसऱ्याची आयडिया कशी खोटी आहे, असा टोमणाही फडणवीस यांनी मारल्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.