Eknath Shinde : अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एक कोटी रुपये लाच देण्याच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात पोलिसांनी ब्लॅकमेल करणाऱ्या मुलीला अटक केली आहे. डिझायनर असलेल्या या तरुणीने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणावरून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी जयसिंघानी प्रकरणी सध्या काय कार्यवाही सुरू आहे याची माहिती दिली.
वाचा : फडणवीसांनी उल्लेख केलेला अनिल जयसिंघानी आहे तरी कोण?
शिंदे म्हणाले, की अनिल जयसिंघानी प्रकरणाचा तपास होत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल. यामागे कोण सूत्रधार आहे ते शोधून काढले जाईल. यासाठी आमची पोलीस यंत्रणा सक्षम आहे. राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर जाऊ नये काही संकेत पाळावे लागतात. अनिल जयसिंघानी हा महाविकास आघाडीतील सर्व पक्ष फिरला आहे. त्याची चौकशी होईल या पाठीमागे नेमके कोण आहे, याचाही शोध घेतला जाईल.
Big Breaking : बुकी अनिल जयसिंघानी यांचे उद्धव ठाकरे, वरूण सरदेसाईशी संबंध!
जयसिंघानी प्रकरणात जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे काम सध्या सुरू आहे. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सभागृहात माहिती दिल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.