Download App

महाराष्ट्र दिन स्पेशल; संयुक्त महाराष्ट्र चळवळ माहितीय का?

Maharashtra Day Special : उद्या संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस (labor day) म्हणूनही साजरा केला जातो. विशेष म्हणजे गुजरात (Gujarat) दिवसही उद्याच आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर काही काळ गुजरात आणि महाराष्ट्र (Maharashtra) हे दोन्ही राज्य मुंबई प्रांताचे भाग होते. त्यावेळी या मुंबई प्रांतात मराठी आणि गुजराती भाषकांची संख्या अधिक होती. दोन्ही भाषिकांकडून स्वतंत्र राज्याची मागणी केली जात होती. त्यामुळे भाषावार प्रांतरचनेमुळे गुजरात आणि महाराष्ट्र या दोन वेगळ्या राज्याची घोषणा करण्यात आली. 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. त्यामुळे 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.

तत्कालीन केंद्र सरकारने 1956 च्या राज्य पुर्नगठन अधिनियमानुसार अनेक राज्याची स्थापना करण्यात आली. भाषावर प्रांतरचना करण्यात आली. कन्नड भाषा बोलणाऱ्यांसाठी कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली. तर तेलुगू भाषिकांसाठी आंध्रप्रदेश आणि मल्याळम बोलणाऱ्यासांठी केरळ राज्याची स्थापना करण्यात आली. तामिळ बोलणाऱ्यासांठी तामिळनाडूची निर्मिती झाली. पण त्यावेळी मराठी आणि गुजराती भाषा बोलणाऱ्यांसाठी वेगळं राज्य निर्माण करण्यात आलं नाही. गुजरात आणि महाराष्ट्र हा मुंबई प्रांताचाच एक भाग होते.

उद्धव ठाकरेंना नाचवण्याचे काम राष्ट्रवादी करतेय, दरेकरांचा हल्लाबोल

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ (Samyukta Maharashtra Samiti)
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी भाषिकांनी जोरदार आंदोलन केलं. गुजराती भाषिकांनीही वेगळ्या राज्याची मागणी लावून धरली. जाळपोळ, मोर्चे आणि आंदोलने सुरु होती. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 105 जणांनी आपल्या बलिदाची आहुती दिली. फ्लोरा फाउंटन येथे संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचंड आंदोलन करण्यात आले. त्यावेळी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे गोळीबार करण्याचा आदेश देण्यात आला होता. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 आंदोलक हुतात्मा झाले. त्यानंतर केंद्र सरकारने 1 मे 1960 रोजी मुंबई प्रांताला बॉम्बे पुर्नगठन अधिनियम 1960 नुसार महाराष्ट आणि गुजरात या दोन राज्याची निर्मिती करण्यात आली.

दोन राज्यांच्या निर्मितीनंतर मुंबई आपल्याच मिळावी म्हणून मराठी आणि गुजराती भाषकांमध्ये वाद निर्माण झाला. त्यावरही आंदोलन झाले. पण मराठी भाषकांच्या प्रखर विरोधामुळे आणि आक्रमक आंदोलनामुळे अखेर मुंबई महाराष्ट्राला मिळाली. संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली.

Tags

follow us