धुळ्यात मेणबत्तीच्या कारखान्याला आग; चार महिलांचा होरपळून मृत्यू

Dhule Wax Factory Fire : धुळे जिल्ह्यातील चिखलीपाडा गावातील एका मेणबत्तीच्या कारखान्याला लागलेल्या आगीत चार महिलांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत काही महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अतिकच्या ‘त्या’ शेवटच्या पत्रात काही ‘बड्या’ नेत्यांची नावे? धुळ्यातील साक्री तालुक्यातील निजामपूरपासून काही अंतरावर चिखलीपाडा गाव आहे. या गावात मेणबत्तीचा कारखाना आहे. या कारखान्यात शॉर्ट सर्किटमुळे […]

Fire

Fire

Dhule Wax Factory Fire : धुळे जिल्ह्यातील चिखलीपाडा गावातील एका मेणबत्तीच्या कारखान्याला लागलेल्या आगीत चार महिलांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत काही महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

अतिकच्या ‘त्या’ शेवटच्या पत्रात काही ‘बड्या’ नेत्यांची नावे?

धुळ्यातील साक्री तालुक्यातील निजामपूरपासून काही अंतरावर चिखलीपाडा गाव आहे. या गावात मेणबत्तीचा कारखाना आहे. या कारखान्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या भीषण आगीत चार महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या महिलांना पुढील उपचारासाठी नंदूरबार येथे नेण्यात आले आहे.

या घटनेची माहिती पोलिसांनाच मिळताच पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षकही येथे आले. त्यांनी या घटनेची आणखी माहिती घेतली. याबाबत सविस्तर माहिती आगीचे नेमके कारण काय होते आणखी काही घटक कारणीभूत होते का याबाबत तपासानंतरच स्पष्टता येणार आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे उष्णता वाढत आहे. अशातच अशी घटना घडली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत निश्चित माहिती अजून मिळालेली नाही. मात्र, कारखान्यातील आग इतकी भीषण होती की यामध्ये चार महिला जागीच गतप्राण झाल्या. ज्या महिला जखमी झाल्या आहेत त्यांना पुढील उपचारासाठी शेजारील नंदूरबार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version