महाराष्ट्रात दुष्काळसदृश्य परिस्थिती; फडणवीस-शिंदे आज शेतकऱ्यांच्या बांधावर

Maharashtra Drought: महाराष्ट्रातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आढावा घेणार आहेत.

Maharashtra Drought

Maharashtra Drought

Maharashtra Drought: महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने प्रत्यक्ष पाहणीला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) आज लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून, पिकांची आणि शेतीच्या परिस्थितीची पाहणी करणार आहेत. लातूर जिल्ह्यात दोन ठिकाणी पाहणी केल्यानंतर ते धाराशिवमधील कळंब तालुक्यातील एरमाळा आणि तुळजापूर परिसरात जाणार आहेत. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील तीन ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेण्याचे त्यांचे नियोजन आहे.

बंगालच्या उपसागरातील डीप डिप्रेशनचा प्रभाव; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना पावसाचा इशारा

दरम्यान, राज्यातील दुष्काळग्रस्त भागांसाठी पहिली अधिसूचना शनिवारपूर्वी जारी करण्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे. प्राथमिक स्वरूपात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार संबंधित भागांचा समावेश केला जाणार असून, पुढील काळात नव्याने माहिती मिळाल्यास इतर भागही त्यात समाविष्ट केले जाऊ शकतात. दुष्काळी उपाययोजनांसाठी केंद्राकडे आर्थिक मदतीचा प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू आहे. मात्र, केंद्राकडून मदत मिळेपर्यंत राज्य सरकार थांबणार नसून आवश्यक मदत आणि उपाययोजना सुरूच राहतील, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

एकनाथ शिंदे आज अमरावती-अकोला दौऱ्यावर

मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही (Eknath Shinde) आज विदर्भातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात अमरावती आणि अकोला जिल्ह्यांचा समावेश आहे. या दौऱ्यात एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेण्यावर भर देणार आहेत.

करार करा नाहीतर कठोर कारवाईला सामोरं जा; इराणला डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

शिंदेंनी मंत्र्यांना देखील आपापल्या भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत. पिकांचे पंचनामे, प्रत्यक्ष पाहणी आणि गावपातळीवर जनतेच्या अडचणी जाणून घेण्यासाठी जनता दरबार घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सुनेत्रा पवारांकडून वरूड-मोर्शीचा आढावा

अमरावती जिल्ह्यातील वरूड आणि मोर्शी तालुक्यांमध्येही दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने या भागातील समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले गेले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी या भागातील परिस्थितीबाबत माहिती घेतली आहे. शेतकरी, नागरिक आणि पाणीटंचाईच्या प्रश्नांबाबत मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

दुष्काळ निवारणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. या समितीत गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, पंकजा मुंडे, दत्तात्रय भरणे, जयकुमार गोरे, संजय राठोड, प्रताप सरनाईक, बाबासाहेब पाटील आणि मकरंद पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे समितीचे सदस्य सचिव असतील.

“टाटा समूहाचा वारसा जपणे ही काळाची गरज”; शरद पवारांचा नोएल टाटा यांना पाठिंबा

दुष्काळाशी संबंधित सूचना आणि स्थानिक पातळीवरील तक्रारींचा या समितीकडून आढावा घेतला जाणार आहे. तातडीच्या आणि लहान स्वरूपाच्या तक्रारी सोडवण्यासाठी समितीला अधिकार देण्यात आले आहेत. समितीच्या अहवालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पुढील निर्णय घेणार आहेत.

Exit mobile version