Maharashtra Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला धोबीपछाड दिला. या निवडणुकीत महायुतीची चांगलीच पिछेहाट झाली. मागील निवडणुकीत 23 जागा जिंकणारा भाजप फक्त 9 जागांवरच थांबला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीलाही काहीच कमाल करता आली नाही. या निवडणुकीत बसलेला फटका काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न महायुतीने विधानपरिषदेच्या निवडणुकीत केला. या निवडणुकीत महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले. महायुतीततला ताळमेळही दिसून आला. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची (Devendra Fadnavis) स्ट्रॅटेजी कामाला आली अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत.
तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीचे वारे आणखी (MLC Elections 2024) वेगात वाहू लागले आहेत. याच अनुषंगाने दैनिक सकाळने राज्यात केलेला एक सर्वे आज चर्चेत आहे. या सर्वेक्षणात राज्यातील जनतेने पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला आहे. मात्र भाजप हाच पक्ष सर्वात मोठा राहिल असा सूर या सर्वेतून दिसून आला आहे. राज्यात दोन पक्षात मोठी फूट झाली. या फुटीसाठी भाजपलाच (BJP) टार्गेट करण्यात आलं. या राजकारणाचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) बसलाच. या परिस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत काय चित्रअस असेल याचा अंदाज याद्वारे घेण्यात आला.
महायुती भक्कम! काँग्रेसची आठ मतं फुटल्याने ‘मविआ’ला तडे; जयंत पाटीलही पराभूत
मुख्यमंत्रिपदासाठी भाजपमधील कोणता नेता आवडेल असा प्रश्न लोकांना विचारण्यात आला. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना 18.80 टक्के मते मिळाली. भाजपमधून आणखी कोण या प्रश्नावर अंदाज घेतला असता तब्बल 47.24 टक्के लोकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव सांगितलं. तसेच विनोद तावडे यांना 6.29 टक्के लोकांनी पसंती दिली. तर 5.6 टक्के लोकांनी आमदार पंकजा मुंडे मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार असल्याचे सांगितले.
विधानसभा निवडणुकीआधी विधानपरिषदेची अकरा जागांची निवडणूक (MLC Election 2024) महायुती आणि महाविकास आघाडीसाठी परीक्षा घेणारी ठरली. या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीतील (Elections 2024) पराभवाचा थोडासा का होईना वचपा महायुतीने काढल्याचे (Mahayuti) दिसले. या निवडणुकीत महायुतीने एकूण 9 उमेदवारांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
मी जिंकलो आणि हरलो तरी चिंतन करतो, मात्र निवडणुकांतील घोडेबाजार चिंतेचा विषय -जयंत पाटील
भाजपने योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके आणि अमित गोरखे यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाने माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना तिकीट दिले होते. या सर्व उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला.