तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी सभा घेत महाराष्ट्रामध्ये आपले हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. अनेक माजी आमदारांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केला. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केसीआर सातत्याने भाष्य करत असतात. यावरुन आता महाराष्ट्रातील बीआरएसचे नेते हरिभाऊ राठोड यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.
मागील वर्षी 23 जून 2022 रोजी कापसाला प्रतिक्विंटल 14 हजार रुपये भाव मिळाला होता. माझ्या भावाने शंभर क्विंटल कापूस विकला त्याच्या बदल्यात त्याला 14 लाख रुपयांचा धनादेश मिळाला, तो अक्षरशः घरी हसत हसत आला होता. आज 23 जून रोजी त्याला फक्त प्रतिक्विंटल 7 हजार रुपये, इतकाच भाव मिळाला आणि त्याच्या बदल्या सात लाख रुपयाचा धनादेश घेऊन आज तो डोळ्यात आसवे घेऊन घरी आला, असे हरिभाऊ राठोड म्हणाले.
Video …जेव्हा शांत, संयमी हरिभाऊ बागडे अधिकाऱ्यांना फैलावर घेतात, पाहा व्हिडीओ
यवतमाळ जिल्ह्यात आर्णी येथील “चाय पे चर्चा” या कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिली होती की, खर्चाच्या दीडपट शेतकऱ्यांच्या मालाला सरकारकडून भाव देऊ. परंतु, आज परिस्थिती वेगळी आहे आणि विशेष म्हणजे भाजपवाले या विषयावर शब्दही काढत नाहीत. तसेच महाराष्ट्रातील विरोधी पक्ष सुद्धा मूग गिळून गप्प बसला आहे, असे म्हणत त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर निशाणा साधला.
Patna Opposition Parties Meeting : विरोधकांचे मिशन 2024! पण, राऊतांनी व्यक्त केली वेगळीच ‘भीती’
आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपुढे एकच पर्याय आणि आशेचे किरण दिसत आहे ते म्हणजे के.सी.आर. आता केसीआर यांचे “अब की बार किसान सरकार” आल्याशिवाय शेतकऱ्यांचे दुःख दूर होणार नाही. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येणार नाहीत, असे राठोड म्हणाले.