Seeds : बोगस बियाणे….चंद्रशेखर बावनकुळेंनी शेतकऱ्यांचं टेन्शनच मिटवून टाकलं!

राज्यातील बोगस बियाण्याबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी एक मोठी घोषणा केलीयं. या घोषणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालायं.

chandrashekhar bawankule

chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule : पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर आधीच संकट आहे, त्यातच आता बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा अर्थिक बसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बोगस बियाण्यांमुळे पीक न उगवल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊन दुबार पेरणीची वेळ आल्यास बाधित शेतकऱ्यांना मोफत बियाणे देणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) यांनी केलीयं.

‘तरस’ ते ‘शॅम्पेन’… शर्वरीच्या प्रवासाचे कोरिओग्राफर विजय गांगुलींकडून कौतुक: “ती स्टेप्स अगदी बटरसारख्या सहज करत होती!”

राज्यात अनेक ठिकाणी पुरवठादाराने बोगस बियाणे दिल्याने सोयाबीन किंवा कापसाचे पीक उगवले नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. पीक पेरणीनंतर किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पीक न उगवल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ येत आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांवर अर्थिक ताण येऊ नये, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याचंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय.

काय म्हणाले बावनकुळे?
बोगस बियाण्यांमुळे पीक न उगवल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊन दुबार पेरणीची वेळ आल्यास, शेतकऱ्यांना स्वखर्चाने बियाणे खरेदी करावे लागणार नाही. अशा बाधित शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मोफत बी-बियाणे उपलब्ध करून दिले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

गाडीचं मायलेज तुम्ही किंवा मी तपासूच शकत नाही; E20 च्या वादात गडकरींनी संभ्रम वाढवला

दरम्यान, राज्यातील अनेक भागात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. अनेक नामांकित कंपन्यांचे बियाणे पेरणी करूनही काहीच उगवले नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांची मेहनत वाया जाते आणि आर्थिक फटका बसतो.

Exit mobile version