Download App

Maharashtra Fourth Women Policy : राज्यात महिलांचं चौथं धोरण येणार; अजित पवार यांनी केली घोषणा…

Maharashtra Fourth Women Policy : राज्यात महिलांचं चौथं धोरण आणणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान, सह्याद्री अतिगृहावर महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

थायलंडचे माजी पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा 15 वर्षांनंतर मायदेशी परतले

अजित पवार म्हणाले, राज्यात पहिलं महिला धोरण 1994 साली आलं होतं. त्यानंतर 2001 साली दुसरं आणि 2014 साली तिसरं धोरण आणलं होतं. आता आम्ही आता आम्ही 2023 मध्ये चौथं धोरण आणणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

Pune : पतीचे कोरोनात निधन; अल्पवयीन पुतण्यावर दीड वर्षांपासून काकीची जबरदस्ती

महिलांच्या प्रश्नांवर आजच्या बैठकीत धोरणासंदर्भात महिलांशी चर्चा करण्याचं मंत्री आदिती तटकरे यांनी सुचवलं होतं. त्यानंतर राज्यातील वेगवेगळ्या महिला संघटनांशी, सहकारी महिलांना आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिला होता. या बैठकीत जवळपास 1 लाख महिलांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Ghoomer Movie: दिव्यांगांनीही पाहिला ‘घूमर’, चिमुकल्यांची अभिषेक, सैयामीशी मस्ती

महिलांबाबतचं धोरण याआधीच आम्हाला आणायचं होतं परंतु काही कारणास्तव आम्हाला विलंब झाला आहे. त्यावेळी महिला व बालविकास खात्याच्या मंत्री यशोमती ठाकूर होत्या, त्यानंतर मंगलप्रसाद लोढा आणि आता आदिती तटकरे असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून महिलांच्या सुरक्षेसह इतरही समस्या ऐरणीवर आलेल्या आहेत. त्यामुळेच राज्य सरकारकडून महिलांविषयीचं नवीन धोरण आणण्यात येत आहे.

Tags

follow us