Scholarship For Folk Art & Folk Instruments Learning Student : लोककला अन् लोकवाद्य शिकणाऱ्यांंना राज्य सरकारकडून शिष्यवृत्ती देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांची संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली आहे.
नव्या पिढीला होणार लोककलेची ओळख, नरेंद्र फिरोदियांनी हाती घेतला Folkवंत उपक्रम
ज्या पद्धतीने शासनाच्या सांस्कृतिक संचनालयातर्फे शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या 12 विद्यार्थ्यांना महिन्याला 5 हजार रुपये पंडित भीमसेन जोशी
शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती दोन वर्षे एका विद्यार्थ्यांना मिळते. तशाच प्रकारे यापुढे लोककला शिकणाऱ्या 12 आणि लोकवाद्य शिकणाऱ्या 12 अशा चोवीस विद्यार्थ्यांना शासनातर्फे शिष्यवृत्ती देण्यात येईल. प्रत्येकी 5 हजार रुपये प्रमाणे ही शिष्यवृत्ती देण्यात येईल. त्याचे नियम नियमावली लवकरच जाहीर करु, असेही मंत्री अँड आशिष शेलार यांनी जाहीर केले.
Revenge Quitting : नववर्षात अनेक कर्मचाऱ्यांचा नोकरीला ‘रामराम’; ‘रिवेंज क्विटिंग’ चा ट्रेंड चर्चेत…
मराठी चित्रपटांसाठीही करण्यात आली मोठी घोषणा
मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री अॅड.आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी काल (दि.28) पत्रकार परिषदेत केली होती. यावर्षीचा हा पहिला चित्रपट महोत्सव मुंबईत होणार असून तीन दिवसांचा हा महोत्सव असेल. जे मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाहीत असे चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येतील.
‘असर’चा धक्कादायक अहवाल; राज्यातील तिसरी ते पाचवीच्या ५०% विद्यार्थ्यांना वाचताही येईना
प्रत्येक चित्रपटासोबत त्या चित्रपटाची टीम उपस्थित असेल जी थेट दर्शकांशी संवाद साधेल, या निमित्त काही विशेष परिसंवाद व या विषयातील अभ्यासकांच्या मुलाखती अशा आंतरराष्ट्रीय मानकांच्या स्वरूपात राज्याचा मराठी चित्रपट महोत्सव केला जाणार आहे. याबाबतच्या तारखा व नियमनियमावली लवकरच जाहीर करण्यात येतील. या महोत्सवात दर्जेदार मराठी चित्रपटांचा आस्वाद चित्रपट रसिकांना मिळणार आहे. याबाबतची अमलबजावणी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे.