Maharashtra Public Holiday In 2026 : अवघ्या काही दिवसात 2025 संपणार असून आपण 2026 मध्ये प्रवेश करणार आहे. सध्या संपूर्ण जगात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी होताना दिसत आहे. यातच आता महाराष्ट्र सरकारकडून 2026 मध्ये असणाऱ्या सर्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. परिनियम्य संलेख अधिनियम, 1881 च्या कलम 25 अंतर्गत जारी करण्यात आलेल्या या अधिसूचनेनुसार, 2026 मध्ये महाराष्ट्रात 24 सर्वाजनिक सुट्ट्या असणार आहे. तर बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी 1 एप्रिल 2026 रोजी राज्य सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याचबरोबर राज्य सरकारने 11 नोव्हेंबर 2026 रोजी असणाऱ्या भाऊबीजसाठी देखील एक अतिरिक्त सुट्टी जाहीर केली आहे.
2026 मध्ये प्रजासत्ताक दिन, 26 जानेवारीपासून सार्वजनिक सुट्ट्यांची सुरुवात होणार आहे. तर फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्री,15 फेब्रुवारी रोजी आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी असणार आहे. मार्चमध्ये 4 सर्वाजनिक सुट्ट्या असणार आहे. होळी 3 मार्च, गुढीपाडवा 19 मार्च, रमजान ईद 21 मार्च आणि रामनवमी 26 मार्चच्या दिवशी सुट्टी असणार आहे.
तर एप्रिल महिन्यात 3 एप्रिल रोजी गुड फ्रायडे आणि 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याच बरोबर फक्त बँकांसाठी 1 एप्रिल 2026 रोजी सुट्टी असणार आहे. मे महिन्यात महाराष्ट्र दिन 1 मे , बुद्ध पौर्णिमा 1 मे आणि बकरी ईद 28 मे रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जून महिन्यात मोहरमनिमित्त 26 जून रोजी सूट्टी असणार आहे. ऑगस्ट महिन्यात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि परशी नववर्ष (शहेनशाही) , ईद-ए-मिलाद 26 ऑगस्ट रोजी सुट्टी असणार आहे.सप्टेंबर महिन्यात 14 सप्टेंबर गणेश चतुर्थनिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर ऑक्टोबर महिन्यात महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर आणि दसरानिमित्त 20 ऑक्टोबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सावध राहा, पुढील 48 तास पुणे, अहिल्यानगरसह ‘या’ 13 जिल्ह्यांत थंडीची लाट; अलर्ट जारी
नोव्हेंबर महिन्यात लक्ष्मीपूजन 8 नोव्हेंबर, दिवाळी 10 नोव्हेंबर आणि भाऊबीज 11 नोव्हेंबर (अतिरिक्त सुट्टी), गुरुनानक जयंती 24 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर डिसेंबर महिन्यात ख्रिसमसनिमित्त 25 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
2026 मधील प्रमुख सुट्ट्या
प्रजासत्ताक दिन – 26 जानेवारी (सोमवार)
महाशिवरात्री – 15 फेब्रुवारी (रविवार)
छत्रपती शिवाजी महाराज जयंती – 19 फेब्रुवारी (गुरुवार)
होळी (दुसरा दिवस) – 3 मार्च (मंगळवार)
गुढीपाडवा – 19 मार्च (गुरुवार)
रमजान ईद – 21 मार्च (शनिवार)
रामनवमी – 26 मार्च (गुरुवार)
गुड फ्रायडे – 3 एप्रिल (शुक्रवार)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – 14 एप्रिल (मंगळवार)
महाराष्ट्र दिन – 1 मे (शुक्रवार)
बुद्ध पौर्णिमा – 1 मे (शुक्रवार)
बकरी ईद – 28 मे (गुरुवार)
मोहरम – 26 जून (शुक्रवार)
स्वातंत्र्य दिन – 15 ऑगस्ट (शनिवार)
परशी नववर्ष (शहेनशाही) – 15 ऑगस्ट (शनिवार)
ईद-ए-मिलाद – 26 ऑगस्ट (बुधवार)
गणेश चतुर्थी – 14 सप्टेंबर (सोमवार)
महात्मा गांधी जयंती – 2 ऑक्टोबर (शुक्रवार)
दसरा – 20 ऑक्टोबर (मंगळवार)
लक्ष्मीपूजन – 8 नोव्हेंबर (रविवार)
दिवाळी – 10 नोव्हेंबर (मंगळवार)
गुरुनानक जयंती – 24 नोव्हेंबर (मंगळवार)
ख्रिसमस – 25 डिसेंबर (शुक्रवार)
अतिरिक्त सुट्टी
भाऊबीज – 11 नोव्हेंबर (बुधवार)
फक्त बँकांसाठी सुट्टी
1 एप्रिल 2026 – वार्षिक खाते बंद करण्यासाठी
