Government Decision : राज्यातील आमदार आणि खासदारांना सन्मानाची सौजन्याची वागणूक मिळण्यासंदर्भात (Government Decision ) राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलायं. सर्व मंत्रालयीन व प्रशासनिक विभाग, विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, निमशासकीय कार्यालय, संस्था, महामंडळे यांना यासंदर्भातील विशेष मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. आमदार, खासदारांना संबंधित अधिकारी, कर्मचारी वर्गाने आदराची, सौजन्याची वागणूक द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
एवढंच नाही तर आमदार, खासदारांचे म्हणणे ऐकून प्रासंगित शासकीय नियम, प्रक्रियेनुसार शक्य तेवढी मदत करण्याचेही शासनाच्या निर्णयात म्हटलंय. यासोबतच स्थानिक पातळीवरील शासकीय उद्घाटन, लोकार्पणांच्या कार्यक्रमांमध्ये सर्व केंद्रीय, राज्यातील मंत्री, राज्यमंत्री, पालकमंत्री, विधानमंडळ सदस्य, महापौर, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष सरपंच अशा लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात यावे, याची निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडून खात्री करुनच कार्यक्रम पत्रिकेत त्यांची अचूक नावे छापावीत, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, विधिमंडळाच्या विविध समित्यांच्या सदस्यांचे आचरण कसे असावे, यासाठी नितीमूल्य समिती स्थापन करण्यात आली आहे. आमदार चैनसुख संचेती हे या समितीचे अध्यक्ष असून समितीने अहवाल दिल्यानंतर वर्तनाचे नियम निश्चित होणार असल्याची माहिती आहे. समितीत चैनसुख संचेतींसोबतच सुधीर मुनगंटीवार, विजय देशमुख, दीपक केसरकर, दिलीप वळसे पाटील, सुनिल प्रभू, अमिन पटेल, अमरिश पटेल, आणि रामराजे निंबाळकर समितीत असणार आहे.
