आरशात बघा! मी बघतो पण तुम्ही शेतकऱ्यांकडे बघा; फडणवीसांना ठाकरेंचं खास शैलीत उत्तर

मी आरशात बघतो पण तुम्ही शेतकऱ्यांकडे बघा, असं खास शैलीत प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलंय.

Devendra Fadanvis

Udhav Thackeray On Cm Devendra Fadanvis : मी आरशात बघतो पण तुम्ही शेतकऱ्यांकडे बघा, असं खास शैलीत प्रत्युत्तर उद्धव ठाकरे (Udhav Thackekray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलंय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काल छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘हंबरडा मोर्चा’ काढण्यात आला. सरकारने मदतीची घोषणा केली असली तरी, पंचनामे अद्यापही झाले नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय.

फडणवीस सरकारला वठणीवर आणणारच! हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश…

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी आरशात बघतो पण तुम्ही शेतकऱ्यांकडे बघा. तुम्ही सांगता की, हे शेतकऱ्यांवर भीषण संकट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कशात पाहायचं? हा त्यांना प्रश्न आहे. मी मुख्यमंत्री असताना नागपुरात अधिवेशन झालं तेव्हा असं कुठंलंही संकट नव्हतं तरीही मी शेतकऱ्यांसाठी कर्तव्य म्हणून 2 लाखांपर्यंत पीक कर्जमुक्ती केली होती, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय.

अहिल्यानगरमध्ये रविवारी जिल्हा व्यापी महिला परिषद; ज्येष्ठ स्त्रावादी कार्यकर्च्या अॅड. निशा शिवूरकर करणार मार्गदर्शन

काय म्हणाले होते मुख्यमंत्री फडणवीस?
उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात बघितलं तर ते असे मोर्चे काढणार नाही. त्यांच्या काळात जेव्हा शेतकऱ्यांचं असं नुकसान झालं होतं. त्यावेळी त्यांनी नेमके किती पैसे दिले हे बघितलं तर त्यांना असा मोर्चा काढण्याचा अधिकार आहे का? पण ठीक आहे त्यांनाही आपल्या पक्षाला जिवंत ठेवायंच आहे. त्यामुळे ते प्रयत्न करीत आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

अभिनेत्री स्मिता गोंडकरचं बिकनीवर फोटोशूट, फोटोंमध्ये अदकरीचा कहर; चाहते घायाळ

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या मोर्चात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केलीं. ते म्हणाले, आजपर्यंत कोणी अशी थाप मारली नव्हती. इतिहासातील पहिली मोठी थाप फडणवीस सरकारने केली, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, कळवळा आला असता तर नरेंद्र मोदी नुकतेच महाराष्ट्रात येऊन गेले. त्यांत दोन-तीन भाषणे झाली, पण त्यात शेतकऱ्यांबद्दल उल्लेख नव्हता.

follow us