Public Holidays 2024 : नवीन वर्षात तब्बल नऊ ‘लाँग विकेंड’; महाराष्ट्रातील 24 सुट्ट्यांची यादी जाहीर

Public Holidays for 2024 मुंबई : आगामी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने 2024 च्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार 2024 या कॅलेंडर वर्षासाठी 24 सार्वजनिक सुट्ट्या (Public Holidays for 2024) असणार आहेत. (Maharashtra government has released the list of 24 Public Holidays for 2024.) या 24 सुट्ट्यांपैकी […]

Eknath shinde holidays

Eknath shinde holidays

Public Holidays for 2024

मुंबई : आगामी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने 2024 च्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार 2024 या कॅलेंडर वर्षासाठी 24 सार्वजनिक सुट्ट्या (Public Holidays for 2024) असणार आहेत. (Maharashtra government has released the list of 24 Public Holidays for 2024.)

या 24 सुट्ट्यांपैकी 9 सुट्ट्या शनिवार आणि रविवार या साप्ताहिक सुट्ट्यांना जोडून आल्या आहेत. त्यापैकी चार सुट्ट्या सोमवारी आल्या आहेत, तर पाच सुट्ट्या शुक्रवारी आल्या आहेत. विशेष म्हणजे या पैकी तीन सुट्ट्या मार्च महिन्यात आल्या आहेत. याशिवाय मंगळवारी एक, बुधवारी पाच, गुरुवारी चार, शनिवारी तीन आणि रविवारी दोन सुट्ट्या असणार आहेत.

महाराष्ट्र सरकारच्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांची यादी :

प्रजासत्ताक दिन – 26 जानेवारी, शुक्रवार
छत्रपती शिवाजी महाराज जयंती – 19 फेब्रुवारी, सोमवार
महाशिवरात्री – 8 मार्च, शुक्रवार
होळी – 25 मार्च, सोमवार
गुड फ्रायडे – 29 मार्च, शुक्रवार
गुढी पाडवा – 9 एप्रिल, मंगळवार
रमजान-इद (इद-उल-फितर) – 11 एप्रिल, गुरुवार
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती – 14 एप्रिल, रविवार
रामनवमी – 17 एप्रिल, बुधवार
महावीर जन्मकल्याणक – 21 एप्रिल, रविवार
महाराष्ट्र दिन – 1 मे, बुधवार
बुद्ध पौर्णिमा – 23 मे, गुरुवार
बकरी-ईद (ईद-उल-जुहा) – 17 जून, सोमवार
मोहरम – 17 जुलै, बुधवार
स्वातंत्र्य दिन – 15 ऑगस्ट, गुरुवार
पारशी नववर्ष (शहेनशाही) 15 ऑगस्ट, गुरुवार
गणेश चतुर्थी – 7 सप्टेंबर, शनिवार
ईद-ए-मिलाद – 16 सप्टेंबर, सोमवार
महात्मा गांधी जयंती – 2 ऑक्टोबर, बुधवार
दसरा – 12 ऑक्टोबर, शनिवार
दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) – 1 नोव्हेंबर, शुक्रवार
दिवाळी (बळी प्रतिपदा) – 2 नोव्हेंबर, शनिवार
गुरु नानक जयंती – 15 नोव्हेंबर, शुक्रवार
नाताळ – 25 डिसेंबर, बुधवार

Exit mobile version