Download App

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’च्या लाभार्थ्यांनाठी मोठी बातमी; अर्जाची मुदत वाढली, वय आणि कागदपत्राच्या किचकट अटी हटविल्या

Lakdaki Bahin Yojana च्या लाभार्थ्यांना आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत विधानसभेत मोठी घोषणा केली आहे.

Maharashtra Government Lakdaki Bahin Yojana Extend Application Deadline : राज्य सरकारने (Maharashtra Government) नुकत्याच जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ (Lakdaki Bahin Yojana) योजनेच्या लाभार्थ्यांना आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार आता या योजनेच्या लाभार्थ्यांना अर्ज करण्याची मुदत (Application Deadline) वाढवून देण्यात आली आहे.

पोलिसांची नोकरी सोडून सत्संग करणारे भोले बाबा कोण आहे? एका क्लीकवर जाणून घ्या संपूर्ण इतिहास

याविषयी सांगतना मुख्यमंत्री म्हणाले की, या योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.1 जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दि. 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. लाभार्थी महिलांना दि. 01 जुलै, 2024 पासून दर माह रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

सव्वा लाख भाविक, प्रवचन अन् अचानक चेंगराचेंगरी, शंभरहून अधिक मृत्यू, ‘हे’ आहे खरे कारण

तर या अगोदर या योजनेतील लाभार्थ्यांच्या वयोमर्यादेबाबत मोठी अपडेट समोर आली होती. ती म्हणजे योजनेसाठी 60 वर्ष वयोगटापर्यंत मर्यादा ठेवण्यात आली होती. परंतु, आता ही अट काढून टाकण्यात आली असून, ही मर्यादा आता 65 वर्ष करण्यात आली आहे, अशी माहिती शिंदेंनी सभागृहात दिली आहे. याशिवाय जमिनीच्या मालकीची देखील अट काढण्यात आली आहे.

योजना नेमकी काय?

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात महिला वर्गाला खुश करण्यासाठी महायुती सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget sessions)मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Chief Minister Majhi Ladaki Baheen Yojana)घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नेमकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे तरी काय? त्या योजनेसाठी कोण पात्र आहेत? त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे? जाणून घेऊया…

भोलेबाबांच्या सत्संगात मृत्यू तांडव; शंभरहून अधिक जणांचा गेला जीव, महिलांची संख्या सर्वाधिक

या योजनेच्या माध्यमातून महिन्याला महिलांना १ हजार ५०० रुपये दिले जाणार आहेत. यासाठी पहिले महिलांना 21 ते 60 वयोगटाची मर्यादा ठेवण्यात आली होती. मात्र, आता यात वयाच्या अट वाढवण्यात आली असून, 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. शिवाय जमिनीबाबतची अटही काढूण टाकण्यात आली आहे. ही योजना गरीब महिलांसाठी असणार असून, पिवळं आणि केशरी रेशनकार्ड धारकांना याचा लाभ होणार आहे. या योजना अंर्तगत लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रति माह दिले जातील. कमीतकमी 3.50 कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे. दरम्यान, लाभार्थी 21 ते 60 वय असलेली महिला असेल. तसंच, त्यांचं वर्षाला उत्पन्न 2,50,500 पेक्षा कमी असावं अशी आहे.

योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
महाराष्ट्रातील 21 ते 6 वर्ष वयोगटाकील विवाहित, विधवा, घटस्फोटीत महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता :
1) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी
2) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
3) कमीत कमी 21 वर्ष ते जास्तीत जास्त 60 वर्षांपर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार.
4) लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक.
5) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
1) रेशन कार्ड
2) लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
3) महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र, जन्म दाखला.
4) उत्पन्नाचा दाखला.
5) बँक खाते झेरॉक्स.
6) पासपोर्ट आकाराचा फोटो
7) योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.

योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
योजनेसाठी अर्ज पोर्टल, मोबाईल अॅप, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल.

follow us