Farmer Loan Waiver : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईत राज्य सरकाने मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर कर्ज माफीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी देखील मिळाली आहे. तर आता राज्य सरकारकडून कर्ज माफीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जीआरमध्ये राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.
जीआरनुसार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, कृषी मंत्री, सहकार मंत्री आणि सहकार प्रधान सचिवांचा सदस्य असणार आहे.
तर दुसरीकडे कर्ज माफीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने देखील करण्यात येणार असं या जीआरमध्ये (Farmer Loan Waiver) सांगण्यात आले आहे. याच बरोबर कर्ज माफी योजनेची संपूर्ण प्रक्रिया हे सहकार निंबंधक आणि आयुक्त पाहणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. तसेच या मागणीसाठी राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन देखील करण्यात येत होते.
BCCI ची मोठी घोषणा; 6 वर्षांनंतर ‘या’ देशात कसोटी खेळणार भारतीय संघ
तर आता कर्ज माफीची मागणी सरकारने मान्य केली असून यासाठी आता जीआर देखील काढण्यात आल्याने आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळणार आहे.
