Download App

शरद पवार ज्येष्ठ नाही तर वयोवृद्ध नेते, सदावर्तेंनी पुन्हा डिवचले!

Sadavarte Criticized Sharad Pawar : एसटी कर्मचाऱ्यांना सहकारी बँकेतून बाजार बुणग्यांना कष्ट करणाऱ्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे आम्हाला एसटी कर्मचारी सहकारी बँकेच्या निवडणुकीची फार काळजी नाही. स्वतंत्र विदर्भासाठी एसटी कामगार सहकारी बँकेचे मुख्यालय नागपुरात व्हावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. शरद पवार (Sharad Pawar) ज्येष्ठ नाहीत तर ते फक्त वयोवृद्ध नेते आहेत, अशी टीका गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी केली.

सदावर्ते आज नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, स्वतंत्र विदर्भासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही स्वतंत्र विदर्भवादी आहोत. लहान राज्यांची संकल्पना पुढे घेऊन आम्ही निघालो आहोत. शरद पवार ज्याला खानदेश म्हणतात आमच्या दृष्टीने तो उत्तर महाराष्ट्र आहे, अशी टीका सदावर्ते यांनी केली.

अमित शाहंपर्यंत गेलेला वाद… पडदा पडताच श्रीकांत शिंदेंनी ठरवला लोकल लेव्हलचा

आम्ही हे नाही म्हणत की पवारांची सटकली आहे. मात्र त्यांना वारंवार धडे द्यावे लागणार आहे. काल पवारांच्या उपस्थितीमध्ये मराठा समाजाचा अपमान झाला.शरद पवार हे ज्येष्ठ नेते नाही, ते फक्त वयोवृद्ध नेते आहे. शरद पवारांना ज्येष्ठ नेता म्हणून आम्ही मानत नाही, त्यांना वयोवृद्ध म्हणून मानतो.याच नागपूरमध्ये जेव्हा गोवारी मोर्चात चेंगराचेंगरी झाली. तेव्हा शरद पवार इथून विमानतळावर निघून गेले होते. त्यामुळे पवारांना आम्ही ज्येष्ठ नेते कसे मानू. ते फक्त वयोवृद्ध आहे, अशी टीका सदावर्ते यांनी केली.

महाविकास आघाडीचा सरकार गेलं आणि शिंदे फडणवीस यांचा सरकार आलं. त्यानंतर आम्ही एसटी कामगारांच्या विविध प्रश्नांचा पाठपुरावा करत आहोत. महागाई भत्त्याबद्दल आम्ही सर्वांना समानतेच्या पातळीवर आणले आहे. समानतेने बोनस दिले जात आहे. मागच्या सरकारने सिल्वर ओकवर आंदोलन करणाऱ्यांना एसटी कर्मचाऱ्यांना गुन्ह्यात अडकवले होते. मात्र फडणवीस यांनी त्यांना पुन्हा नोकरी दिली आहे. एसटी कामगारांच्या शासनातील विलनीकरणाची लढाई आम्ही पुढे ही लढत राहू, असे त्यांनी सांगितले.

मुंबईत बेसिक गोष्टी मिळेनात अन् नाईट लाईफ… श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

Tags

follow us