मुंबईत बेसिक गोष्टी मिळेनात अन् नाईट लाईफ… श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

मुंबईत बेसिक गोष्टी मिळेनात अन् नाईट लाईफ… श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

Shrikant Shinde On Aditya Thackeray : खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण-भिवंडी (Kalyan-Bhiwandi)लोकसभा मतदारक्षेत्रातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिकांसाठी आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटासह, उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईच्या डेव्हलपमेंटवरुनही खासदार श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुंबईमधील सर्वसामान्यांच्या बेसिक समस्या सोडवू शकले नाहीत, त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेला बेसिक गोष्टी मिळत नाहित आणि नाईट लाईफ थोपवण्याचं काम केलं जात असल्याचा हल्लोबोल खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde)यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)आणि उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केला आहे. (mumbai-shrikant-shinde-on-aditya-thackeray-basic-facilities-night-life)

Ameesha Patel Case: ‘गदर 2’ च्या रिलीजआधी तोंड लपवून कोर्टात पोहचली अमिषा पटेल; जाणून घ्या नेमकं प्रकरण

आज आम्ही मुंबईमध्ये लोकांपर्यंत आम्ही पोहोचतोय.कारण यापूर्वी फक्त भावनिक राजकारण व्हायचं लोकांच्या समस्या सोडवायचं कोणाला पडलंय? त्याच्यावर लोकं मतदान घ्यायची, डेव्हलपमेंटची काणाला पडलीय, मुंबईमध्ये लोकांच्या छोट्या-छोट्या समस्या आहेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

श्रीकांत शिंदेंचा आक्रमक बाणा; भाजपसह शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना घेतले धारेवर

श्रीकांत शिंदे म्हणाले की, मी काल आरे कॉलनीमध्ये गेलो होतो, त्या ठिकाणी गेल्या 20 ते 25 वर्षांपासून आदिवासी लोकं अंधारात राहत आहेत. आरे कॉलनीत असल्यामुळं त्यांना 20-25 वर्षात लाईट देऊ शकलेले नाहित. त्यामुळे एवढी मोठी मुंबई असताना, त्यांच्याकडे पाहण्यासाठी आपल्याकडे वेळ नसल्याची टीका उद्धव ठाकरेंवर केली आहे.

अंबरनाथ, कल्याण-डोंबलीचे रस्ते चांगले आहेत, मात्र मुंबईत आजही डांबरी रस्ते आहेत. ज्या मुंबई महापालिकेचं बजेट 50 हजार कोटींपेक्षा जास्त आहे, डिपॉझिट 90 हजार कोटींपेक्षा जास्त आहे. अशा मुंबई महापालिकेकडून लोकांच्या बेसिक गोष्टी पूर्ण होत नाहित पण मुंबईसाठी काय पाहिजे तर नाईट लाईफ पाहिजे.

हे वेगळे धोरणं, आज ते जिकडं गेले आहेत तिकडून ते काहितरी शिकून येतात, आणि त्या ठिकाणी काय पाहिजे तर नाईट लाईफ पाहिजे, नाईट लाईफ कोणाला पाहिजे असा सवालही यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला. आज आमचा सामान्य मध्यमवर्गीय आहे, तो सकाळी कामाला धक्के खात जातो, संध्याकाळी कामावरुन येतो, आपल्या परिवारासोबत दोन तास त्याला घालवायचे असतात, मग नाईट लाईफ कोणाला पाहिजे, असा सवाल करत ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या करायच्या नाहित आणि दुसऱ्याच गोष्टी लोकांवर थोपवायच्या असा जोरदार हल्लाबोल खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube